श्री.बी.आर.शेलार
कर्यकारी अभियंता(ल.पा/पा.पु)
ज़िल्हा परीषद लातूर
|
प्रस्तावना. लघु सिंचन / ग्रामीण पाणी पुरवठा विभाग हा जिल्हा परिषद लातुर येथील एक महत्वपुर्ण विभाग असून या विभागाअंतर्गत उदगीर व औसा,येथे लघु सिंचन उपविभाग मंजुर आहेत. तसेच लातूर, रेणापूर, अहमदपूर, देवणी, जळकोट, निलंगा येथे ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाचा समावेश आहे.त्याच प्रमाणे उपअभियंता (यांत्रीकी) व उप अभियंता देखभाल दुरस्तीकक्षाचा ही समावेश या विभागात करण्यात आलेला आहे. सदर उपविभागाचे अंतर्गत राजशिष्टाचार, रचना व कार्यपध्दती, योजनानिहाय विकास कामे, तसेच आस्थापना विषयक बाबींचा समावेश आहे. लघु सिंचन / ग्रामीण पाणी पुरवठा विभागामध्ये तांत्रिक, लेखा तसेच आस्थापना विषयक कामे होतात. लघु सिंचन / ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला जिल्हा विकास नियोजन समिती आणि विकास कार्यक्रमांतर्गत शासकीय अनुदान प्राप्त होत असून यामधून उपविभागाअंतर्गत ग्रामीण भागात प्रामुख्याने बंधारे, तलाव, सिंचन विहिरी, ग्रामीण पाणी पुरवठा इत्यादी योजनानिहाय विकास कामे केली जातात. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी हे ग्रामीण पाणी पुरवठा या योजनांचे विभाग प्रमुख असून, तसेच मा. अति. मुख्य कार्यकारी अधिकारी हे लघु सिंचन या योजनांचे विभाग प्रमुख असून, कार्यकारी अभियंता हे कार्यालय प्रमुख आहेत. कार्यकारी अभियंता यांचे अधिपत्याखाली सहा. कार्यकारी अभियंता, अधिक्षक, सहा. लेखा अधिकारी, शाखा अभियंता व इतर आस्थापना लिपीक व परिचर इत्यादी अधिकारी कर्मचारी आहेत. या प्रशासकीय अधिकायाकडे एकूण १६ कार्यासनामध्ये या विभागाकडील सर्व विषयांची विभागणी करण्यात आलेली आहे. |
|
विभागाचा दुरध्वनी क्रमांक | ||
02382 245303 | ||
विभागाचा ईमेल |
||
eebnatur@rediffmail.com | ||
ज्या गावातील पाण्याचे उद्भव गुणवत्ता बाधीत झालेल्या आहेत.अशा गावांना शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यासाठी खालील योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
|
|
संकेतस्थळ निर्मिती व देखभाल -सामान्य प्रशासन विभाग,जिल्हा परिषद,लातुर © 2015
|