बंद

    केशव बाळाजी मंदिर, औसा (जि. लातूर)

    भगवान वेंकटेश बालाजी यांचे हे भव्य मंदिर आहे. हे मंदिर दक्षिण भारतातील मंदिरांच्या धर्तीवर बांधलेले असून, दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणावर भाविक येतात केशव बाळाजी मंदिर हे आंध्र प्रदेशातील तिरुमला मंदिराच्या धर्तीवर औसा (लातूरपासून २० किमी) येथे डोंगरावर वसवलेले आहे. या मंदिरात तिरुमलाच्या पद्धतीने पूजा केली जाते. येथे वर्षातून दोन वेळा मोठे धार्मिक उत्सव होतात.मंदिर परिसरात श्री वीरनाथ महाराज मंदिर (३०० वर्षे जुने), श्री गणेश, शिव, विठ्ठल-रुक्मिणी यांचे मंदिरे व केशवानंद बापूंची समाधी आहे. दर शुक्रवारी महाप्रसादाचे आयोजन होते. मंदिरात रोज सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत दर्शन करता येते.

    संपर्क तपशील

    पत्ता: केशव बाळाजी मंदिर, औसा-याकतपूर रोड, ता. औसा, जि. लातूर – ४१३५२०

    श्री केशव बालाजी देवस्थान, औसा