औसाचा भुईकोट किल्ला (जि. लातूर)
औसा शहराच्या दक्षिणेस ५.५२ हेक्टर क्षेत्रात वसलेला भुईकोट किल्ला बहमनी काळात महमूद गवान यांनी १४६६ मध्ये बांधला. किल्ला खोलगट भागात असल्यामुळे जवळ गेल्याशिवाय दिसत नाही. त्याच्या बांधकामात तुर्की व युरोपीय शैलीचा प्रभाव दिसतो.
किल्ल्यात लोखंडी दरवाजा, राणी महाल, लाल महाल, पाणी महाल, परी बावडी, कटोरा बावडी, चांद बावडी यांसारखी ऐतिहासिक ठिकाणे आहेत. हा किल्ला भूतकाळात यादव, बहमनी, निजामशाही, आदिलशाही, मुघल व इंग्रजांच्या ताब्यात होता. औसा शहराचा ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक वारसाही समृद्ध आहे.
संपर्क तपशील
पत्ता: खंडाळ गल्ली, संभाजीनगर, औसा, महाराष्ट्र 413520
 
                                    कसे पोहोचाल?
रस्त्याने
औसा किल्ला लातूरपासून २० किमी अंतरावर, लातूर-तुळजापूर महामार्ग क्रमांक ३६१ वर आहे. तेथे जाण्यासाठी खासगी वाहनांची सोय आहे.
 
         
        