बंद

    समाज कल्याण विभाग

    परिचय

    समाज कल्याण विभाग हा जिल्हा परिषद लातूरच्या १४ विभागांपैकी एक महत्त्वाचा विभाग आहे. जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे या विभागाचे प्रमुख आहेत. मागासवर्गीय व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याचे कार्य समाज कल्याण विभागामार्फत केले जाते. विभागाचा मुख्य हेतू म्हणजे समाजातील दुर्बल घटकांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे.

    दृष्टी आणि ध्येय

    • मागासवर्गीय व दिव्यांग व्यक्तींच्या शैक्षणिक व सामाजिक जीवनमानाचा स्तर उंचावणे
    • उपजीविका साधनांच्या माध्यमातून आर्थिक विकासाला चालना देणे
    • समाजातील सर्व घटकांना समान संधी उपलब्ध करून देणे
    • शासन धोरणांनुसार २०% निधी मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी खर्च करणे

    उद्दिष्टे व कार्ये

    • जिल्हा परिषद सेस फंडामार्फत मागासवर्गीय व दिव्यांग व्यक्तींसाठी विविध योजना राबविणे
    • महाराष्ट्र शासनाच्या समाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजना अंमलात आणणे
    • मागासवर्गीय व दिव्यांग व्यक्तींसाठी स्वयंपूर्णतेचा विकास साधणे
    • समाज कल्याण समितीच्या माध्यमातून योजनांची अंमलबजावणी व नियंत्रण

    अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा:-