लघु सिंचन विभाग
परिचय
लघु सिंचन / ग्रामीण पाणी पुरवठा विभाग हा जिल्हा परिषद लातुर येथील एक महत्वपुर्ण विभाग असून या विभागाअंतर्गत उदगीर व औसा येथे लघु सिंचन उपविभाग मंजूर आहेत. तसेच लातूर, रेणापूर, अहमदपूर, देवणी, जळकोट, निलंगा येथे ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाचा समावेश आहे. त्याचप्रमाणे उपअभियंता (यांत्रिकी) व उप अभियंता देखभाल दुरुस्ती कक्षाचाही या विभागात समावेश करण्यात आलेला आहे. सदर उपविभागांअंतर्गत राजशिष्टाचार, रचना व कार्यपध्दती, योजनानिहाय विकास कामे तसेच आस्थापना विषयक बाबींचा समावेश आहे. लघु सिंचन / ग्रामीण पाणी पुरवठा विभागामध्ये तांत्रिक, लेखा तसेच आस्थापना विषयक कामे केली जातात. लघु सिंचन / ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला जिल्हा विकास नियोजन समिती आणि विकास कार्यक्रमांतर्गत शासकीय अनुदान प्राप्त होत असून, यामधून उपविभागांअंतर्गत ग्रामीण भागात प्रामुख्याने बंधारे, तलाव, सिंचन विहिरी, ग्रामीण पाणी पुरवठा इत्यादी योजनानिहाय विकास कामे केली जातात. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी हे ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचे विभाग प्रमुख असून, मा. अति. मुख्य कार्यकारी अधिकारी हे लघु सिंचन योजनांचे विभाग प्रमुख आहेत. कार्यकारी अभियंता हे कार्यालय प्रमुख आहेत. कार्यकारी अभियंता यांच्या अधिपत्याखाली सहायक कार्यकारी अभियंता, अधिक्षक, सहायक लेखा अधिकारी, शाखा अभियंता व इतर आस्थापना लिपिक व परिचर अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे एकूण १६ कार्यासनांमध्ये या विभागाकडील सर्व विषयांची विभागणी करण्यात आलेली आहे.
दृष्टी :
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयीसाठी व नागरिकांना सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टिकाऊ व प्रभावी पायाभूत सुविधा निर्माण करणे.
<h2 ध्येय:
लघु सिंचन व ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे ग्रामीण भागातील जलस्रोतांचे व्यवस्थापन करणे, जलसंधारणाला प्रोत्साहन देणे आणि शाश्वत विकासाला चालना देणे.
उद्दिष्टे व कार्ये
- लघु सिंचन योजना
- लघु सिंचन तलावांची निर्मिती.
- पाझर तलाव व गावतळे सुशोभीकरण.
- कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे निर्माण व देखभाल.
- ग्रामीण पाणी पुरवठा योजना
- शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करणे.
- विंधन विहिरी, नळ पाणी योजना राबविणे.
- पाणी गुणवत्ता बाधित गावांमध्ये शुद्ध पाणी पुरवठा योजना राबविणे.