बंद

    बांधकाम विभाग

    परिचय

    बांधकाम विभाग हा जिल्हा परिषद लातूर अंतर्गत १६ विभागांपैकी एक महत्त्वाचा विभाग आहे. कार्यकारी अभियंता हे विभागाचे प्रमुख असून त्यांच्या अधिपत्याखाली उपकार्यकारी अभियंता, शाखा अभियंता, स्थापत्य सहाय्यक अभियंता, आरेखक आणि कनिष्ठ अभियंता कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील रस्ते, पूल, इमारतींचे बांधकाम, देखभाल, दुरुस्ती, तसेच विविध विकास योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या विभागावर आहे.

    दृष्टी आणि ध्येय

    • ग्रामीण भागातील दर्जेदार रस्ते व पायाभूत सुविधा पुरवणे.
    • बांधकाम क्षेत्रात पारदर्शकता आणि कार्यक्षमतेचा अवलंब करणे.
    • विकास योजनांचा प्रभावी व जलद अंमलबजावणी.
    • स्थानिक रोजगार संधी वाढविणे.
    • पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करून टिकाऊ विकास साधणे.

    उद्दिष्टे व कार्ये

    • रस्ते, पूल, इमारतींचे बांधकाम व देखभाल.
    • निधीच्या उपलब्धतेनुसार कामांचे नियोजन व अंदाजपत्रके तयार करणे.
    • प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मंजुरी प्रक्रिया.
    • विकास कामांसाठी निविदा प्रक्रिया व ठेकेदार नियुक्ती.
    • कामांची देखरेख व गुणवत्तेची तपासणी.

    अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा:-