बंद

    जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग

    परिचय

    जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन हा जिल्हा परिषदेमध्ये असणाऱ्या एकूण 14 विभागांपैकी एक महत्वाचा विभाग आहे. प्रकल्प संचालक (जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन ) हे या विभागाचे प्रमुख आहेत. वैयक्तिक शौचालय बांधकाम, सार्वजनिक शौचालय बांधकाम, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, गोबरधन, मैलागाळव्यवस्थापन, प्लॉस्टिक वेस्ट मॅनेजमेंट व स्वच्छतेविषयक विविध विषयावर प्रशिक्षण व जनजागृती उपक्रम या विभागामार्फत राबविले जातात.

    उद्दिष्टये

    • जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन या विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व जल जीवन मिशन या केंद्र शासनाच्या महत्वाच्या योजना गावपातळीवर राबविल्या जातात.
    • स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या केंद्र पुरस्कृत योजनेतून पात्र लाभार्थ्यांना रुपये 12,000/- वैयक्तिक शौचालय प्रोत्साहन अनुदान या विभागामार्फत देण्यात येते. तसेच, सार्वजनिक शौचालय बांधकाम व घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प गावपातळीवर राबविले जातात.
    • जल जीवन मिशन या केंद्र पुरस्कृत योजनेतून वैयक्तिक नळजोडणी नसलेल्या कुटूंबाला वैयक्तिक नळजोडणी देण्यात येते.
    • जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन या विभागामार्फत स्वच्छतेविषयक विविध विषयांची प्रशिक्षणे व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात.

    अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा:-