महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना ,जिल्हा परिषद लातुर आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
श्री.एस.जी.माने
गटविकास अधिकारी, म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो.कक्ष, जिल्हा परिषद,लातूर

प्रस्तावना

महाराष्ट्रात 1972 पासून रोजगार हमी योजना राबविण्यात येत होती.याच धर्तीवर केंद्र सरकारने 2005 साली राष्ट्रीय रोजगार हमी कायदा करून प्रत्येक कुटुंबाना 100 दिवसाचे अकुशल काम प्रत्येक आर्थिक वर्षात उपलब्ध करून देण्याची हमी दिली आहे.18 वर्ष पूर्ण झालेल्या व अकुशल काम करून इच्छिणा-या जॉबकार्डधारक व्यक्तीस त्याने कामाची मागणी केल्यावर 15 दिवसाच्या आत काम उपलब्ध करून दिले जाते.किमान मजुरीचा दर केंद्र सरकार दरवर्षी किंवा आवश्यकतेनुसार आढावा घेऊन निश्चित करते. सन 2016-17 चा किमान मजुरी दर रुपये 201/- आहे.

विभागाचा दुरध्वनी क्रमांक
02382-251855
विभागाचा ईमेल

mregszpltr@gmail.com

लातूर जिल्हात मागील वर्षी सन 2015-16 मध्ये घेतलेल्या कामाची माहिती
अ.क्र किती कामे चालू झाली किती कामे पूर्ण झाली किती कामे प्रगती पथावर आहेत किती मनुष्यदिन निर्मिती झाली अकुशल खर्च (रु.लक्ष) कुशल खर्च (रु.लक्ष) किती कुटुंबाना रोजगार मिळाला
1. 5618 1849 3769 2744320 4543.21 1313.4 37896
लातूर जिल्हात मागील वर्षी सन 2016-17 मध्ये घेतलेल्या कामाची माहिती
1. 1601 24 1577 2321238 5079.21 1497.43 41197
शासन परिपत्रक क्र.मग्रारोहयो-2016/प्र.क्र.-39/रोहयो -7 दिनांक 04 ऑगस्ट 2016 नुसार खालील प्रमाणे कामे सुचविण्यात आलेली आहेत.  
अ.क्र
कामाचा तपशील
1 सिंचन विहिरी (अहिल्यादेवी सिंचन विहिरी )
2 शेततळे (नरेगातील शेततळे व मागेल त्याला शेततळे या योजनेतील शेततळे )अमृतकुंड शेततळे.
3 व्हर्मी कंपोस्टिंग (भू-संजीवनी व्हर्मी कंपोस्टिंग )
4 नाडेप कंपोस्टिंग (भू-संजीवनी नाडेप कंपोस्टिंग).
5 फळबाग लागवड (कल्पवृक्ष फळबाग लागवड).
6 शौचालाय (निर्मल शौचालाय ).
7 शौषखड्डे (निर्मल शौषखड्डे).
8 गाव तलाव / पारंपरिक पाणीसाठयाचे नूतनीकरण व गाळ काढणे ,जलसंधारणाची कामे (समृद्ध गाव तलाव व इतर समृद्ध जलसंधारणाची कामे).
9 रोपांची निर्मिती (अकुंर रोपवाटिका ).
10 वृक्षलागवड, संगोपन व संरक्षण (नंदनवन वृक्षलागवड, संगोपन व संरक्षण )
11 ग्राम सबलीकरण (क्रीडांगण/ अंगणवाडी / स्मशानभूमी सुशोभीकरण / ग्रामपंचायत भवन / गावांतर्गत रस्ते / घरकुल / गुरांचा गोठा / कुक्कटपालन शेड / शेळीपालन शेड / मत्स्यव्यवसाय ओटे ) (ग्रामसबलीकरणाची समृध्द योजना क्रिडांगणे / अंगणवाडी /स्मशानभुमी सुशोभीकरण /स्मशानभुमी ओटा व शेड बांधकाम /स्मशानभुमीकडे जाणारा रस्ता व वृक्षलागवड /ग्रामपंचायत भवन/घरकुल / गावांतर्गत रस्ते / गुरांचा गोठा /कुक्कुटपालन शेड/शेळीपालन शेड / मत्स्यव्यवसाय ओटे )
   
संकेतस्थळ निर्मिती व देखभाल -सामान्य प्रशासन विभाग,जिल्हा परिषद,लातुर © 2015