बंद

    महिला व बालविकास विभाग

    सर्वसाधारण माहिती

    केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्यात प्रथम २ ऑक्टोबर, १९७५ रोजी अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात सुरु होवून टप्याटप्याने संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आणि लातूर जिल्ह्यात सदर योजना सन १९८०-८१ पासून कार्यान्वित झालेली आहे. केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत ० ते ६ वर्ष वयोगटातील बालके, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, ११ ते १८ वयोगटातील किशोरी मुली तसेच १५ ते ४५ वयोगटातील महिला यांच्या विविध कार्यक्रमांमधून लाभार्थी म्हणून समावेश आहे.

    महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रम

    • मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देणे
    • मुलींना स्वरक्षणासाठी व त्यांच्या शारीरिक विकासासाठी प्रशिक्षण योजना
    • शाळेत जाणाऱ्या मुलींना सायकल वाटप
    • महिला मेळावा आयोजित करणे
    • महिलांना कायदेशीर / विधिविषयक सल्ला देणे
    • महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालविणे
    • कुपोषित मुलांसाठी अतिरिक्त आहार देणे
    • अंगणवाड्यांना साहित्य पुरविणे
    • अंगणवाड्यांमध्ये परसबाग तयार करणे
    • बारावी पास मुलींना (MS-CIT) प्रशिक्षण देणे
    • आर्थिकदृष्ट्या गरीब व गरजू महिलांना, परितक्त्या, विधवा आर्थिक सहाय्य, घरघंटी, हातगाडी वाटप करणे