प्राथमिक शिक्षण विभाग
परिचय
प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद लातूर अंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, अशासकीय व अनुदानित शाळा, तसेच अश्रम शाळांचे शैक्षणिक कामकाज व व्यवस्थापन यावर देखरेख ठेवली जाते. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या नेतृत्वाखाली उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुख हे अधिकारी कार्यरत आहेत.
लातूर जिल्हयामध्ये जिल्हा परिषदेच्या १२३५ प्राथमिक शाळा व ४९ जि.प. प्रशाला आहेत. तसेच विभागाअंतर्गत ४८७ अनुदानित व विनाअनुदानित खाजगी प्राथमिक शाळा आहेत. यात मराठी माध्यमाच्या २७० प्राथमिक शाळा, उर्दू माध्यमाच्या १०१ प्राथमिक शाळा व ११६ इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळा आहेत.
सदरील शाळा पर्यवेक्षणाचे व नियंत्रणाचे काम शिक्षणाधिकारी (प्राथ.), दोन उपशिक्षणाधिकारी (प्राथ.), १० गटशिक्षणाधिकारी, २५ वरीष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, १८ कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी व १०२ केंद्गप्रमुखांमार्फत चालते.
शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या वर्षभरात प्रत्येक शाळेला किमान ४ भेटी होणे अपेक्षित आहेत. त्यात एक अचानक शाळा भेट, दुसरी निरोप देऊन भेट, तिसरी शाळा तपासणीस्तव भेट व चौथी तपासणीनंतर त्रुटी पुर्ततेच्या मार्गदर्शनास्तव भेट.
केंद्रप्रमुखांच्या महिन्यात केंद्रातील प्रत्येक शाळेस किमान दोन भेटी अपेक्षित आहेत, परंतु सर्व शिक्षा अभियान व विविध योजनांची अंमलबजावणी, चौकशी संदर्भात अशा साधारणपणे विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांच्या नियोजनापेक्षा जास्त भेटी होतात.
व्हिजन:
सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व सर्वसमावेशक प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देणे.
मिशन:
१००% विद्यार्थ्यांची उपस्थिती व शिक्षणात सहभाग सुनिश्चित करणे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक शैक्षणिक पद्धतींचा अवलंब करणे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा 2009 अंमलात आणणे.
उद्दिष्टे व कार्ये
- जिल्हा परिषद सदस्यांच्या सहभागासह शिक्षण समिती बैठका आयोजित करणे.
- विविध शैक्षणिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी व देखरेख करणे.
- शाळा तपासणी व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी कार्यक्रम राबविणे.
- विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण.
- शालेय पोषण आहार योजनांची प्रभावी अंमलबजावणी.