आरोग्य विभाग
परिचय
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद लातूर हा ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ वैद्यकीय सेवा पुरविणारा प्रमुख विभाग आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी हे विभागाचे प्रमुख असून संपूर्ण जिल्ह्यातील आरोग्य सेवा योजनांचे नियोजन, अंमलबजावणी व देखरेख यांचे कार्य पाहतात. लातूर जिल्ह्यात एकूण 46 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 252 उपकेंद्रे कार्यरत आहेत. या माध्यमातून मातृमृत्यू दर, बालमृत्यू दर घटविणे, रोगनियंत्रण, कुटुंब कल्याण इत्यादी सेवा पुरविल्या जातात.
दृष्टी :
- सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे
- राष्ट्रीय व राज्यस्तरीय आरोग्य योजना प्रभावीपणे राबविणे
- बालक व मातांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रभावी कार्यक्रम
- रोग नियंत्रण व प्रतिबंधक उपाययोजना
- आयुष प्रणालीचा प्रचार व प्रसार
ध्येय:
- आरोग्य सेवा व वैद्यकीय शिबिरांचे आयोजन
- राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रम
- प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांची देखभाल
- गरोदर माता व बालकांसाठी लसीकरण व उपचार
- सामाजिक आरोग्य जनजागृती मोहीम