बंद

    वित्त विभाग

    परिचय

    वित्त विभाग, जिल्हा परिषद, लातूरच्या आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थापन महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 तसेच लेखा कोड 1968 नुसार करते. यासोबतच शासन निर्णयानुसार वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या आदेशांची अंमलबजावणी केली जाते.

    या विभागामार्फत कोषागारामार्फत शासकीय निधीची मागणी व त्याची प्राप्ती केली जाते आणि विविध विभागांना त्यांच्या गरजेनुसार निधीचे वितरण केले जाते. तसेच विभागाकडे प्राप्ती व खर्चाची नोंद ठेवणे, निवृत्तीवेतन लाभांचे वितरण करणे, कर्मचारी निवृत्तीवेतन निधी व दिनांक ३१/१०/२००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांचा अंशदान निधी व्यवस्थापन करणे तसेच जिल्हा परिषदेच्या विश्वस्त व नियमित प्रशासनाशी संबंधित बाबींचे कामकाज पाहिले जाते.

    👁️‍🗨️ दृष्टी

    📑 महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961 व लेखा संहिता 1968 नुसार विहित केल्याप्रमाणे तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या वित्तीय व्यवहारांचे सनियंत्रण करणे…

    🎯 ध्येय

    🧾 जिल्हा परिषदाचा अर्थसंकल्प लेखा व लेखा परिक्षण विषयक कामकाज पाहणे.

    📌 उद्दिष्टे व कार्ये
    • 💬 वित्तीय प्रकरणांत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सल्ला देणे.
    • 📂 विभाग प्रमुखाकडील नस्ती व देयकांचे प्रदानपूर्व, पूर्वलेखा परिक्षण करणे.
    • 📊 जिल्हा परिषद लेख्यांचे संकलन.
    • 🔍 जिल्हा परिषदेचे विविध विभाग आणि पंचायत समिती कार्यालयांचे अंतर्गत लेखा परिक्षण.
    🔗 अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा: