बंद

    कृषि विभाग

    📖 परिचय

    भारत हा कृषि प्रधान देश असून कृषि हा अर्थ व्यवस्थेचा आधारस्तंभ मानला जातो. देशाच्या स्थुल राष्ट्रीय उत्पन्नात शेती क्षेत्राचा वाटा 18.5% आहे. भौमितिक पद्धतीने वाढणारी देशाची लोकसंख्या पाहता कृषि उत्पन्नामध्ये वाढ होणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, खते, औजारे, पीक संरक्षण औषधे इ. बाबी शेतकऱ्यांना माफक दरात योग्यवेळी उपलब्ध होणे व त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जाणीव-जागरुकता निर्माण करणे हे उद्दिष्ट ठेऊन व बहुजन हिताय, बहुजन सुखाय या उक्तीप्रमाणे कृषि विभाग, जिल्हा परिषद, लातूर कार्यरत आहे.

    लातूर जिल्हयात एकुण 10 तालुक्यांचा समावेश असून जिल्हयाचे भौगोलिक ७.१५ लक्ष हे. क्षेत्रफळ आहे त्यापैकी लागवडी लायक क्षेत्र ६.६५ लक्ष हे. असून लातूर जिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान ७३४.५५ मि.मी. आहे. कृषी विकास अधिकारी हे विभागाचे प्रमुख आहेत. विभागामार्फत राज्यपुरस्कृत, केंद्रपुरस्कृत आणि जिल्हा परिषद स्वनिधीतून विविध कृषी विकास योजना प्रभावीपणे राबविल्या जातात.

    👁️‍🗨️ दृष्टी आणि ध्येय
    🔭 दृष्टी:

    आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि ग्रामीण भागाचा समग्र विकास साधणे.

    🎯 ध्येय:

    शेतकऱ्यांना आधुनिक कृषी साधन-सुविधा, प्रशिक्षण आणि आर्थिक मदत देऊन त्यांना स्वयंपूर्ण करणे.

    ✅ उद्दिष्टे व कार्ये
    • 📋 राज्य, केंद्र आणि जिल्हा स्तरावरील कृषी योजनांची अंमलबजावणी.
    • 🌾 शेतकऱ्यांसाठी गुणवत्तापूर्ण बी-बियाणे, खते, औषधे आणि कृषी यंत्रसामग्रीचा पुरवठा.
    • 🧪 कृषी निविष्ठा गुणवत्ता नियंत्रण.
    • 💡 कृषी विषयक नवीन तंत्रज्ञानाचे प्रचार-प्रसार.
    • 🏛️ जिल्हा परिषदेच्या कृषी समिती सभेचे कामकाज.

    📑 कृषी योजनांची माहिती

    👨‍🌾 डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

    • 🧑‍🌾 लाभार्थी हा अनुसूचित जाती/नवबौद्ध शेतकरी असावा.
    • 📄 जात प्रमाणपत्र आवश्यक.
    • 🌱 किमान 0.40 हे जमीन आवश्यक (वैयक्तिक/सामूहिक).
    • 📏 कमाल जमीन मर्यादा 6.00 हे.
    • 📜 7/12 व 8 अ उतारा आवश्यक.
    • 🏦 आधार लिंक बँक खाते आवश्यक.
    • 🎯 गायकवाड सबलीकरण योजनेच्या लाभार्थ्यांना प्राधान्य.

    📞 संपर्क: ग्रामसेवक / कृषी अधिकारी / जिल्हा परिषद, लातूर – 02382-259595

    🌿 राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत योजना 2024-25

    • 🏠 दुषणमुक्त घरगुती इंधन.
    • 💡 विद्युत दिवा वापरासाठी उपयुक्त.
    • 🌍 पर्यावरण संवर्धन व रासायनिक खत बचत.
    • ❤️ महिलांच्या आरोग्याचे रक्षण.
    • 💰 अनुदान ₹9,800 ते ₹70,400 (2 ते 25 घ.मी).
    • 📄 आवश्यक कागदपत्रे: 7/12, आधार, पशुधन दाखला, बँक पासबुक.
    • 🔗 ऑनलाईन अर्ज biogas.mnre.gov.in

    📞 संपर्क: ग्रामसेवक / कृषी अधिकारी / जिल्हा परिषद, लातूर – 02382-259595

    🌾 बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

    • 🧑‍🌾 लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा शेतकरी असावा.
    • 🌱 0.40 हे किमान व 6.00 हे कमाल शेतजमीन आवश्यक.
    • 📜 7/12 व 8 अ उतारा, आधारकार्ड आवश्यक.
    • 🏦 आधार लिंक असलेले बँक खाते आवश्यक.
    • 🔗 ऑनलाईन अर्ज mahadbt.maharashtra.gov.in

    📞 संपर्क: ग्रामसेवक / कृषी अधिकारी / जिल्हा परिषद, लातूर – 02382-259595

    ℹ️ अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा: