वित्त विभाग
वित्त विभाग
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961 व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या लेखा संहिता 1968 नुसार विहित केल्याप्रमाणे तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या वित्तीय व्यवहारांचे सनियंत्रण करणे. शासनाकडून प्राप्त होणारा निधी कोशागारामार्फत काढणे, तो जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना त्यांचे मागणीप्रमाणे वितरीत करणे, त्याच्या जमा खर्चाच्या नोंदी ठेवणे, जिल्हा परिषदेमधून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन व इतर लाभांचे शोधन करणे, कर्मचाऱ्यांचे भ.नि. निधी तसेच दिनांक ३१/१०/२००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांचे अंशदायी निधी इ. लेखे ठेवणे. जिल्हा परिषद वित्त विभागातील कामावर नियंत्रण ठेवण्याकरिता त्याच्या आस्थापना तसेच इतर दैनंदिन बाबी हाताळण्याचे काम केले जाते.
जिल्हा परिषदाचा अर्थसंकल्प लेखा व लेखा परिक्षण विषयक कामकाज पाहणे.
- वित्तीय प्रकरणांत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सल्ला देणे.
- विभाग प्रमुखाकडील नस्ती व देयकांचे प्रदानपूर्व, पूर्वलेखा परिक्षण करणे.
- जिल्हा परिषद लेख्यांचे संकलन.
- जिल्हा परिषदेचे विविध विभाग आणि पंचायत समिती कार्यालयांचे अंतर्गत लेखा परिक्षण.