बंद

    प्राथमिक शिक्षण विभाग

    परिचय

    प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद लातूर अंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, अशासकीय व अनुदानित शाळा, तसेच अश्रम शाळांचे शैक्षणिक कामकाज व व्यवस्थापन यावर देखरेख ठेवली जाते. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या नेतृत्वाखाली उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुख हे अधिकारी कार्यरत आहेत.

    लातूर जिल्हयामध्ये जिल्हा परिषदेच्या १२३५ प्राथमिक शाळा व ४९ जि.प. प्रशाला आहेत. तसेच विभागाअंतर्गत ४८७ अनुदानित व विनाअनुदानित खाजगी प्राथमिक शाळा आहेत. यात मराठी माध्यमाच्या २७० प्राथमिक शाळा, उर्दू माध्यमाच्या १०१ प्राथमिक शाळा व ११६ इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळा आहेत.

    सदरील शाळा पर्यवेक्षणाचे व नियंत्रणाचे काम शिक्षणाधिकारी (प्राथ.), दोन उपशिक्षणाधिकारी (प्राथ.), १० गटशिक्षणाधिकारी, २५ वरीष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, १८ कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी व १०२ केंद्रप्रमुखांमार्फत चालते.

    शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या वर्षभरात प्रत्येक शाळेला किमान ४ भेटी होणे अपेक्षित आहेत. त्यात एक अचानक शाळा भेट, दुसरी निरोप देऊन भेट, तिसरी शाळा तपासणीस्तव भेट व चौथी तपासणीनंतर त्रुटी पुर्ततेच्या मार्गदर्शनास्तव भेट.

    केंद्रप्रमुखांच्या महिन्यात केंद्रातील प्रत्येक शाळेस किमान दोन भेटी अपेक्षित आहेत, परंतु सर्व शिक्षा अभियान व विविध योजनांची अंमलबजावणी, चौकशी संदर्भात अशा साधारणपणे विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांच्या नियोजनापेक्षा जास्त भेटी होतात.

    व्हिजन

    सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व सर्वसमावेशक प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देणे.

    मिशन

    १००% विद्यार्थ्यांची उपस्थिती व शिक्षणात सहभाग सुनिश्चित करणे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक शैक्षणिक पद्धतींचा अवलंब करणे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा 2009 अंमलात आणणे.

    उद्दिष्टे व कार्ये
    • जिल्हा परिषद सदस्यांच्या सहभागासह शिक्षण समिती बैठका आयोजित करणे.
    • विविध शैक्षणिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी व देखरेख करणे.
    • शाळा तपासणी व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी कार्यक्रम राबविणे.
    • विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण.
    • शालेय पोषण आहार योजनांची प्रभावी अंमलबजावणी.
    प्राथमिक शिक्षण विभाग अंतर्गत योजनांची माहिती

    1) राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना

    • इ.1 ली ते 12 वी शाळांतील विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूसाठी ₹1,50,000 व अवयव निकामी झाल्यास ₹1,00,000 सहाय्य.
    • आवश्यक कागदपत्रे: घटना अहवाल, थळ पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, वैद्यकीय प्रमाणपत्र.

    2) नवभारत साक्षरता कार्यक्रम

    • 15 वर्षांवरील अशिक्षितांना ऑनलाईन प्रशिक्षण व FLNAT परीक्षा उत्तीर्ण झाल्यास प्रमाणपत्र.

    3) इ.5 वी ते 8 वी शिष्यवृत्ती योजना

    • पात्र विद्यार्थ्यांना MAHADBT पोर्टलवर ₹3000 ते ₹7500 शिष्यवृत्ती.
    • आवश्यक कागदपत्रे: गुणपत्रक, बँक पासबुक झेरॉक्स, शाळेचे बोनाफाईड.

    4) NMMS शिष्यवृत्ती योजना

    • ₹12,000 वार्षिक, 4 वर्षांसाठी एकूण ₹48,000 (उत्तीर्ण विद्यार्थ्यांना).
    • आवश्यक कागदपत्रे: उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचा दाखला, आधार, बोनाफाईड, गुणपत्रक.

    5) इ.1 ली ते 4 थी मुलींना उपस्थिती भत्ता

    • SC/ST व BPL मुलींना ₹1 प्रतिदिन, वार्षिक ₹220 भत्ता तालुका शिक्षणाधिकारीमार्फत.

    6) प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना शैक्षणिक आर्थिक सहाय्य

    • मान्यताप्राप्त संस्थांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ₹3000 ते ₹8000 आर्थिक सहाय्य.

    7) माध्यमिक/उच्च माध्यमिक/अध्यापक विद्यालयातील शिक्षक/कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना सहाय्य

    • शिक्षक/कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ₹3000 ते ₹8000 शैक्षणिक सहाय्य.

    8) माजी सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलत

    • इ.1 ली ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी पुस्तक व गणवेशासाठी ₹70 ते ₹600 वार्षिक सहाय्य.

    9) इयत्ता 1 ली ते 10 वीपर्यंत मोफत शिक्षण

    • शासकीय मान्यताप्राप्त विना अनुदानित संस्थांतील विद्यार्थ्यांना फी व गणवेशासाठी ₹3 ते ₹6 आणि परीक्षा शुल्क ₹2 ते ₹5 देय.

    10) इ.11 वी व 12 वी शिकणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण

    • शासकीय व विना अनुदानित संस्थांतील मुलींना मोफत शिक्षणासाठी ₹83 ते ₹89 प्रति विद्यार्थी शिष्यवृत्ती.

    11) इ.11 वी व 12 वी मुलांना मोफत शिक्षण

    • शासनमान्य अनुदानित संस्थांसाठी ₹77 वार्षिक, विना अनुदानित संस्थांसाठी ₹250 व कौशल्य शिक्षणासाठी ₹100-₹250 अनुदान.

    12) संस्कृत भाषा शिष्यवृत्ती

    • इ.9 वी-10 वी विद्यार्थ्यांना ₹100 प्रति महिना, 11 वी-12 वी साठी ₹125 प्रति महिना (10 महिने).

    13) मराठी भाषा फाउंडेशन योजना

    • इ.8 वी ते 10 वी मराठी माध्यमातील शाळांमध्ये कार्यरत मानसेवी शिक्षकांना ₹5000 प्रति महिना, एकूण ₹45,000 मानधन.

    14) छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती

    • मराठा, कुणबी, कुणबी मराठा गटातील NMMS उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वार्षिक ₹9600, 4 वर्षांसाठी.

    15) दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

    • इ.9 वी व 10 वीतील दिव्यांग विद्यार्थ्यांना वार्षिक ₹9000 ते ₹14600 शिष्यवृत्ती.

    16) खुली गुणवत्ताधारित शिष्यवृत्ती

    • इ.11 वी व 12 वीच्या सर्व विद्यार्थ्यांना MAHADBT मार्फत ₹500 प्रति वर्ष शिष्यवृत्ती.

    17) आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

    • इ.11 वी व 12 वीतील विद्यार्थ्यांना दरवर्षी ₹500 शिष्यवृत्ती (MAHADBT).

    18) शालेय पोषण आहार योजना

    • इ.1 ली ते 8 वीच्या सर्व अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पुरवठा.

    19) जिल्हा बालभवन योजना

    • 6 ते 14 वयोगटातील मुला-मुलींच्या विचारमत्ता विकासासाठी विविध उपक्रम.




    20) एकात्मिक उपक्रम – बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी

    • शाळांमध्ये पोषण, आरोग्य तपासणी, सर्जनशीलता, खेळ, संस्कार यावर भर.

    20) एकात्मिक उपक्रम

    • पोषण, आरोग्य, स्वच्छता, खेळ, संस्कार, समावेशित शिक्षण आदींचा एकत्रित कार्यक्रम.

    21) डिजिटल स्कूल योजना

    • शाळांमध्ये प्रोजेक्टर, डिजिटल सामग्री, ई-कॉन्टेंट वापरून अध्यापन.

    22) आरटीई अंतर्गत 25% आरक्षण प्रवेश योजना

    • खासगी शाळांमध्ये BPL विद्यार्थ्यांसाठी इ.1 लीसाठी मोफत प्रवेश.

    23) वाचन चळवळ

    • विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढवण्यासाठी शाळांमध्ये विशेष उपक्रम.

    24) शालेय मैत्री योजना

    • शाळा सोडलेली मुले पुन्हा शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी पालक-शिक्षक संवाद व भेटी.

    25) बालसभांचे आयोजन

    • विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण व संवाद कौशल्य वाढवण्यासाठी बालसभा.

    26) मिशन गुणवत्ता

    • शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेत सातत्यपूर्ण सुधारणा करण्यासाठी जिल्हा/तालुका स्तरावर उपक्रम.

    27) समावेशित शिक्षण योजना

    • दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुलभ शिक्षण, साधने व विशेष शिक्षकांची नियुक्ती.

    28) आधारभूत साक्षरता आणि संख्याज्ञान (FLN)

    • इ.1 ली ते 3 री पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वाचन, लेखन आणि गणित कौशल्य मजबूत करणे.

    29) ई-शाळा योजना

    • शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षणासाठी डिजिटल टूल्सचा वापर – मोबाईल अ‍ॅप्स, टॅब्लेट्स, LMS.

    30) विद्यार्थी ट्रॅकिंग प्रणाली

    • प्रत्येक विद्यार्थ्याचा नावनोंदणी, उपस्थिती, मूल्यांकन व प्रगती नोंद ठेवणारी प्रणाली.

    31) बालभारती डिजिटल टेबल व पुस्तके

    • इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंत सर्व विषयांची ई-पुस्तके वाचण्यासाठी balbharati.in वर उपलब्ध.

    32) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद उपक्रम (SCERT)

    • शिक्षक प्रशिक्षण, अभ्यासक्रम सुधारणा, मूल्यमापन, ऑनलाईन अभ्यासक्रम आणि DIKSHA पोर्टलवर संसाधने.
    अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा: