बंद

    पशुसंवर्धन विभाग

    परिचय

    लातुर जिल्हा हा दुष्काळग्रस्तं क्षेत्र व काही प्रमाणात पठारी भाग आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, अल्पभूधारक, शेतमजूर, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे यांच्यासाठी दुग्धव्यवसाय महत्वाचा व्यवसाय आहे. शहरीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे दुधासाठी मागणी वाढलेली आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत दुग्धव्यवसाय, शेळीपालन व कुक्कुटपालन व्यवसाय वाढीसाठी कालबद्ध नियोजन करण्यात येत आहे.

    जिल्ह्यामध्ये देवणी व प्रजातीच्या गायींचे संगोपन मोठ्या प्रमाणात केले जाते, तसेच काही प्रमाणात संकरीत गोवंश पण उपलब्ध आहे. मराठवाडी व सुरती या म्हशींच्या जाती प्रमुख आहेत. या जातींमधील दुधाचे प्रमाण चांगले आहे. पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद लातूर अंतर्गत ग्रामीण भागात पशुपालकांसाठी विविध सेवा व योजना राबवितो. दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन यास प्रोत्साहन देऊन पशुपालकांचा आर्थिक विकास सुनिश्चित करण्याचा विभागाचा उद्देश आहे. पशुसंवर्धन दिन २० मे रोजी साजरा केला जातो.

    दृष्टी आणि ध्येय
    • शाश्वत पशुधन विकास
    • ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी
    • रोगमुक्त क्षेत्र निर्मिती
    • कुक्कुटपालन, शेळीपालन व दुग्ध व्यवसायास चालना
    उद्दिष्टे व कार्ये
    • पशुधनाचे अनुवांशिक सुधारणा व संवर्धन
    • रोग नियंत्रण व प्रतिबंधक उपाययोजना
    • दुग्ध व अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे
    • महिलांना व दुर्बल गटांना उपजीविकेची साधने निर्माण
    • प्रशिक्षण व जागृती कार्यक्रम
    पशुसंवर्धन योजनांची माहिती

    1) अनुसूचित जमातीसाठी 10+1 शेळी गट वाटप योजना

    • एका गटात 10 शेळ्या + 1 बोकड (₹8,000 प्रति शेळी, ₹10,000 बोकड)
    • एकूण खर्च: ₹1,03,545 — शासन अनुदान 75%: ₹77,659, लाभार्थी हिस्सा 25%: ₹25,886
    • ₹13,545 विमा शुल्क (3 वर्षांसाठी अनिवार्य)
    • प्राधान्य: दारिद्र्यरेषेखालील, अल्पभूधारक, बेरोजगार, महिला बचत गट

    2) अनुसूचित जाती-जमातीसाठी दूधाळ जनावरांचे गट वाटप

    • गायींचा गट: ₹1,40,000 खर्च, शासन अनुदान ₹1,05,000, लाभार्थी हिस्सा ₹35,000, विमा ₹16,850
    • हशींचा गट: ₹1,60,000 खर्च, शासन अनुदान ₹1,34,443, लाभार्थी हिस्सा ₹44,815, विमा ₹19,258
    • प्राधान्य: दारिद्र्यरेषेखालील, अल्पभूधारक, बेरोजगार, महिला बचत गट

    3) अनुसूचित जातीसाठी पशुधन औषध पुरवठा योजना

    • जंतनाशके पाजणे
    • टॅगिंग / टॅटू चिन्हांकन
    • परजीवी नियंत्रणासाठी उपाययोजना
    • लाभार्थी अनुसूचित जातीचा व किमान एक जनावर असणे आवश्यक

    4) एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम

    • 100 ब्रॉयलर कोंबड्यांचा गट
    • एकूण खर्च: ₹29,500 — शासन अनुदान ₹14,750
    • बेरोजगार आणि ग्रामीण गरजूंसाठी उपयुक्त योजना

    5) पशुधन द्रर्शन व मेळावे

    • जिल्ह्यात लातूर, उदगीर, देवणी, जळकोट येथे आयोजन
    • देवणी, लालकंधार, संकर जातींची बक्षीस स्पर्धा
    • लोक सहभाग आधारित आयोजन — 25% निधी ग्रामपंचायत व सेस

    6) वैरण व पशुखाद्य सुधारणा योजना

    • 1 हेक्टरसाठी 100% अनुदान
    • ₹4000 पर्यंत बी-बियाणे आणि ठिबक सिंचनासाठी सहाय्य
    • किमान 3-4 जनावरे असणे आवश्यक
    अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा: