प्रस्तावना ग्रामपंचायत विभाग हा जिल्हा परिषदे मध्ये असणा-या विभागां पैकी एक महत्वायचा विभाग आहे. ग्रामपंचायत विभागा अंतर्गत महाराष्ट्रे ग्रामिण रोजगार हमी योजना व निर्मल भारत अभियाण या महत्वागच्याभ योजना राबविल्या जातात. तसेच विस्तार अधिकारी (पं) , विस्तार अधिकारी (सां.) , ग्रामविकास अधिकारी , व ग्रामसेवक संवर्गाच्याम आस्थापना सांभाळल्या, जातात. ग्रामपंचायती स्वावलंबी होवून त्यांना स्वायत्त संस्थाप्रमाणे आपला कारभार करण्याचे सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून केंद्गशासनाने 73 वी घटना दुरूस्ती केली . त्यामुळे ग्रामपंचयतींना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे .अशा त-हेने ग्रामपंचयतीची वाटचाल गावातील लोकांना सामाजिक न्याय मिळावा आणि त्यांचा आर्थिक विकास व्हावा या दिशेने सुरू झाली आहे. देशाचा सर्वागिंन विकास होण्यासाठी केंद्गशासनाकडून विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत. विकास योजनाचा लाभ अगदी तळागाळातील माणसाला मिळावा व त्यांची उन्नती / प्रगती व्हावी यासाठी सत्तेचे विकेंद्गीकरण करून जिल्हा परिषद समित्या व ग्रामपंचायती यांना अधिकार देण्यात आले.
|
|
श्री.बी.डी.वाघ उप मुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रा.प.)जिल्हा परिषद लातुर |
|
विभागाचा दुरध्वनी क्रमांक | |
02382245312 | |
विभागाचा ईमेल | |
dyceovplatur@gmail.com |
संकेतस्थळ निर्मिती व देखभाल -सामान्य प्रशासन विभाग,जिल्हा परिषद,लातुर © 2015
|