पशुसंवर्धन विभाग,जिल्हा परिषद लातुर आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
 
श्री.डॉ.बी.यु.बोधनकर
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,जि.प.लातुर.

प्रस्तावना.

लातुर जिल्हा हा दुष्काळग्रस्तं क्षेत्र व काही प्रमाणात पठारी भाग आहे.ग्रामीण भागातील शेतकरी ,अल्पभूधारक, शेतमजुर ,दारिदय रेषेखालील कुटूंबे याचेसाठी दुग्धव्यवसाय महत्वाचा व्यवसाय आहे. शहरीकरण मोठया प्रमाणात झाल्यामुळे दुधासाठी मागणी वाढलेली आहे.पशुसंवर्धन विभागामार्फत दुग्धव्यवसाय, शेळीपालन व कुक्कुटपालन व्यवसाय वाढीसाठी कालबध्द नियोजन करणेत येत आहे.जिल्हयामधे देवणी व प्रजातीच्या गायीचे संगोपण मोठया प्रमाणात केले जाते तसेच काही प्रमाणात संकरीत गोवंश पण उपलब्ध आहे. मराठवाडी व सुरती या म्हशीच्या जाती प्रमुख्याने आहेत.या जातीमधील दुधाचे प्रमाण चांगले आहे.

 
विभागाचा दुरध्वनी क्रमांक
02382 258664

विभागाचा ईमेल

daholatur11@gmail.com
लातुर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन 2019/20 मध्ये राबविण्यात आलेल्या योजना खालीलप्रमाणे आहेत.सदरच्या योजनांची नावे

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत ग्रामीण भागातील पशुपालकांना पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्याकरीता श्रेणी-1 चे 30+1 , श्रेणी-2 चे 91 असे एकुण 122 पशुवैद्यकीय दवाखाने खलील प्रमाणे कार्यरत आहेत.

अ.क्र
तालुका
पशुवैद्यकीय दवाखाने (श्रेणी-1)
पशुवैद्यकीय दवाखाने (श्रेणी-2)
एकुण
सन-2012 चे पशुगणने नुसार लातुर जिल्हयामध्ये खालीलप्रमाणे पशुधन आहे.
अ.क्र.                                                 पशुचा प्रकार                                                 संख्या
1 लातुर 3 13 16 1 गुरे 644101
2 औसा 5 10 15
3 निलंगा 5 10 15 2 शेळया-मेंढया 232016
4 उदगीर 4 21 25
5 अहमदपुर 4 7 11 3 कोंबडया 159759
6 चाकुर 4 11 15
7 रेणापुर 2 6 8 4 इतर 14446
8 देवणी 2 4 6
9 जळकोट 1 4 5 5 एकुण 1050322
10 शिरुर अ. 1 5 6

सदर पशुवैद्यकीय दवाखान्यामधुन पशुधनावर उपचार केले जातात.तसेच चापोली ता.चाकुर येथे एक फिरता पशुवैद्यकीय दवाखाना कार्यरत असुन त्याव्दारे दुर्गम भागामधील गावामधील पशुधनावर प्रत्यक्ष उपचार केले जातात.पंचायत समीती स्तरावर पशुधन विकास अधिकारी (विस्तार) हे तालुका समन्वयक अधिकारी म्हणुन काम करीत असतात. सदर पशुवैद्यकीय दवाखान्यामधुन पशुधनावर उपचार केले जातात.

जिल्हयातील पशुवैद्यकीय संस्थामार्फत नाममात्र सेवा शुल्क आकारुन खालीलप्रमाणे पशुवैद्यकीय सेवा पुरविण्यात येतात.

अ.क्र पशुस्वास्थ्य विषयक सेवा आकारणेत येणारे सेवा शुल्क
  1
पशुरूग्ण विभाग (केस पेपर शुल्क)
  अ) उपचार 1 रुपया प्रती जनावर
        ब) खच्चीकरण 1 रुपया प्रती जनावर
    क)शस्त्रक्रिया 1 रुपया प्रती जनावर
2
शस्त्रक्रिया लहान
अ) कुत्री व मांजरे रु. 20 /- प्रती प्राणी
ब)मोठी जनावरे (खच्चीकरण ) रु. 20 /- प्रती प्राणी
क)वासरे ,शेळी,मेंढी व इतर रु. 20 /- प्रती प्राणी
3
मोठया शस्त्रक्रिया
अ) कुत्री व मांजरे रु. 50 /- प्रती प्राणी
ब)मोठी जनावरे (खच्चीकरण ) रु. 50/- प्रती जनावर दा.रे.खालील लाभधारकांच्या जनावरांसाठी रु. 25/- प्रती जनावर
क)वासरे ,शेळी,मेंढी व इतर रु. 5/- प्रती जनावर
4
कृत्रिम रेतन व अनुषंगीक सेवा
अ)कृत्रिम रेतन (दवाखन्यात) रु.20/- प्रती रेतन
ब) कृत्रिम रेतन (शेतकर्यांवच्या दारात) रु.20/- प्रती रेतन
क) गर्भधारणा तपासणी 3/- रुपये प्रती जनावर
ड) गायी म्हशीतील वंध्यत्व 3/- रुपये प्रती जनावर
5
रोगप्रतिबंधक लसीकरण
अ) जनावरे (लहान व मोठी) 1/- रुपया प्रती जनावर
ब) कोबडया 10 पैसे प्रती कोंबडी
जनावरांची आरोग्य व शवविच्छेदन तपासणी -
6
आरोग्य दाखले
मोठी जनावरे रु. 10/- प्रती जनावर
लहान जनावरे रु. 5/- प्रती जनावर
शवविच्छेदन रु. 50/- प्रती जनावर

शासन निर्णय 11 ऑक्टोंबर 2010 अन्वये जिल्हा परिषदेकडील पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत जमा झलेल्या सेवाशुल्काच्या रकमेपैकी कृत्रीम रेतन कार्याचे सेवाशुल्क वगळुन ऊर्वरीत 100 टक्के सेवाशुल्काची रक्कम पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बळकटीकरणासाठी जिल्हा परिषदेकडे जमा करणेस मंजुरी प्राप्त झाली असुन सदर सेवाशुल्काचा विनीयोग संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बळकटीकरणासाठी करणेत येणार आहे. कृत्रिम रेतन-जिल्हयातील पशुवैद्यकीय संस्थाना कृत्रिम रेतनाकरीता महाराष्ट्र पशुधन विकास मंडळामार्फत खालील प्रमाणे विर्यमात्रांचा पुरवठा केला जातो.

अ.क्र.
वाण
अंदाजे दुग्ध उत्पादन
 1 होलस्टीन फ्रेशीयन 8476 कि.ग्राम
2 होलस्टीन फ्रेशीयन क्रॉस 7767 कि.ग्राम
3 जर्सी 9128 कि.ग्राम
4 जर्सी क्रॉस 3997 कि.ग्राम
4 खीलार 282 कि.ग्राम
5 सुरती 2923 कि.ग्राम
6 मुर्हाक 3740 कि.ग्राम
7 पंढरपुरी 2200 कि.ग्राम

टिप :- कृत्रिम रेतनाद्वारे संकरीकरणाचे प्रमाण 62.5 टक्के चे मर्यादेत ठेवल्याने जनावरांची प्रतीकारशक्ती चांगली राहते.कृत्रिम रेतनाकरीता शेतकर्यां नी नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा. .कृत्रिम रेतनाकरीता महाराष्ट्र पशुधन विकास मंडळामार्फत पुरवठा केलेल्या रेतमात्राचा उपयोग करावा.

संकेतस्थळ निर्मिती व देखभाल -सामान्य प्रशासन विभाग,जिल्हा परिषद,लातुर © 2015