कृषि विभागाकडील योजना
भारत हा कृषि प्रधान देश असून कृषि हा अर्थ व्यवस्थेचा आधारस्तंभ मानला जातो. देशाच्या स्थुल राष्ट्रीय उत्पन्नात शेती क्षेत्राचा वाटा 13.7% आहे. भौमितिक पद्धतीने वाढणारी देशाची लोकसंख्या पाहता कृषि उत्पन्नामध्ये वाढ होणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, खते, औजारे, पीक संरक्षण औषधे इ. बाबी शेतकऱ्यांना माफक दरात योग्यवेळी उपलब्ध होणे व त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जाणीव-जागरुकता निर्माण करणे हे उद्दिष्ट ठेऊन व बहुजन हिताय, बहुजन सुखाय या उक्तीप्रमाणे कृषि विभाग, जिल्हा परिषद, लातूर कार्यरत आहे.
लातूर जिल्हयात एकुण 10 तालुक्यांचा समावेश असून जिल्हयाचे भौगोलिक ७.१५ लक्ष हे. क्षेत्रफळ आहे त्यापैकी लागवडी लायक क्षेत्र ६.६५ लक्ष हे. असून लातूर जिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान ७३४.५५ मि.मि. आहे.
कृषि विभागाकडील योजना
अनुसूचित जाती/नवबौध्द शेतक-यांचे आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी शासनाने अनुसुचित जाती/नवबौध्द शेतक-यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, आदिवासी शेतक-यांसाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेत अनुसुचित जातीव जमातीच्या शेतक-यांना पुढीलप्रमाणे घटकांसाठी पॅकेज स्वरुपात अथवा मागणीनुसार अनुदान देण्यात येईल.
लाभार्थी:
शेतकरी
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे