हत्तीबेट – देवर्जन (उदगीर तालुका)
हत्तीबेट
लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात उदगीर शहराच्या पश्चिमेला १६ कि.मी. अंतरावर मौजे हत्तीबेट हे ठिकाण आहे. हत्तीबेट हे प्राचीन काळापासूनच महत्वाचे धार्मिक व ऐतिहासिक ठिकाण मानले जाते. येथे प्राचीन मंदिरे, लेणी आणि शिल्पकला यांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. हत्तीबेट-देवर्जनला प्रादेशिक पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्रामात येथे स्वातंत्र्यसैनिकांनी रझाकारांविरुद्ध लढा दिला व शेवटपर्यंत हत्तीबेट रझाकारांच्या ताब्यात जाऊ दिले नाही, असे इतिहास सांगतो. येथे दत्तमंदिर आणि गंगाराम महाराज यांची समाधी आहे. दर पौर्णिमेला भजन, कीर्तन व प्रवचनांचे आयोजन होत असते.
पूर्वी हत्तीबेट ओसाड, खडकाळ व निर्जन डोंगर होता. मात्र स्थानिक ग्रामस्थ, प्रशासन आणि विविध संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नांनी ४१ हेक्टरचा हा डोंगर हिरवागार करण्यात आला आहे. हत्तीबेट हे जनसहभागातून घडलेल्या पर्यावरण संवर्धनाचे उत्तम उदाहरण मानले जाते.
संपर्क तपशील
पत्ता: हनुमंतवाडी, महाराष्ट्र 413517
