बंद

    खरौसा लेणी (ता. औसा, जि. लातूर)

    खरौसा लेणी लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील खरौसा गावाजवळ असून लातूरपासून सुमारे ४५ किमी अंतरावर आहेत. जांब्या दगडात कोरलेल्या या लेण्यात एकूण १२ गुहा आहेत.

    डोंगराच्या दुसऱ्या बाजूस रेणुका देवीचे मंदिर व दरगाही आहे. ही लेणी इसवी सनाच्या ६व्या ते ९व्या शतकादरम्यान खोदलेली असल्याचे मानले जाते.

    पहिली लेणी बौद्ध आहे, ज्यात भगवान बुद्धाची बसलेल्या स्थितीतील मूर्ती आहे.

    संपर्क तपशील

    पत्ता: खरौसा लेणी, लमजना-निलंगा रोड, खरौसा, ता. औसा, जि. लातूर – ४१३५२१.

    खरोसा लेणी

    कसे पोहोचाल?

    विमानाने

    पुणे (३७० किमी), हैदराबाद (२९८ किमी), औरंगाबाद (२६४ किमी) हे जवळचे विमानतळ.

    रेल्वेने

    लातूर, लातूर रोड व हरंगुळ रेल्वे स्थानक.

    रस्त्याने

    लमजना-निलंगा रस्त्यावर खरौसा गावाजवळ. लातूर जिल्ह्यातून नियमित एस.टी. सेवा उपलब्ध.