बंद

    वित्त विभाग

    परिचय

    वित्त विभाग

    दृष्टी

    महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961 व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या लेखा संहिता 1968 नुसार विहित केल्याप्रमाणे तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या वित्तीय व्यवहारांचे सनियंत्रण करणे. शासनाकडून प्राप्त होणारा निधी कोशागारामार्फत काढणे, तो जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना त्यांचे मागणीप्रमाणे वितरीत करणे, त्य्नाच्या जमा खर्चाच्या नोंदी ठेवणे, जिल्हा परिषदेमधून निवृत्त होणा-या कर्मचा-याना सेवानिवृत्ती वेतन व इतर लाभांचे शोधन करणे, कर्माचा-यांचे भ.नि. निधी तसेच दिनांक ३१/१०/२००५ नंतर नियुक्त कर्माचा-यांचे अंशदायी निधी इ. लेखे ठेवणे. जिल्हा परिषद, वित्त विभागातील कामावर नियंत्रण ठेवण्याकरिता त्याच्या आस्थापानाविषयक तसेच इतर दैनदिन बाबी हाताळण्याचे काम केले जाते.

    ध्येय

    जिल्हा परिषदाचा अर्थसंकल्प लेखा व लेखा परिक्षण विषयक कामकाज पाहणे.

    उद्दिष्टे व कार्ये

    • वित्तीय प्रकरणांत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सल्ला देणे.
    • विभाग प्रमुखाकडील नस्ती व देयकांचे प्रदानपुर्व, पुर्वलेखा परिक्षण करणे.
    • जिल्हा परिषद लेख्यांचे संकलन.
    • जिल्हा परिषदेचे विविध विभाग आणि पंचायत समिती कार्यालयांचे अंतर्गत लेखा परिक्षण.

    अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा:-