अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या वस्तीचा विकास करणे.
योजनेचे स्वरुप :
  • दलित वस्त्यामध्ये मुलभुत सुविधा जसे- पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, सिमेंट रस्ते/नाली बांधकाम, स्वच्छता विषयक सोयी, मलनिस्सारण, वीज, वस्तीला जोडणारे रस्ते, समाज मंदिर इत्यादी व्यवस्था करुन दलित वस्तीची सर्वांगीण सुधारणा करण्यासंबंधी ही योजना आहे.
  • नियम, अटी व पात्रता इ. :
  • सदर काम मागासवर्गीय वस्ती मध्येच करणे आवश्ययक. वस्तीचा बृहत आराखडा तयार करुन त्यानुसार तथा वस्तीच्या आवश्य्कतेनुसार कामे घेण्या्त येतात. लोकसंख्येच्या सुधारित निकषानुसार प्रत्येक दलित वस्तीला लोकसंख्येच्या प्रमाणात खालीलप्रमाणे अनुदान देण्यात येते.
अ.क्र. लोकसंख्या अनुदान रक्कम (लाखात)
1 10 ते 25 2.00 लाख
2 26 ते 50 5.00 लाख
3 51 ते 100 8.00 लाख
4 101 ते 150 12.00 लाख
5 151 ते 300 15.00 लाख
6 301 च्या पुढे 20.00 लाख