योजनेचे स्वरुप :
- राज्यातील दलित वस्त्यात राहणार्यार अनुसूचित जातीच्या लोकांचे राहणीमान उंचवावे, दलित वस्त्यामध्ये स्वच्छता राहण्यासाठी तेथील रहिवाशांचा सहभाग वाढावा व सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी दलितांमध्ये प्रश्न सोडविण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य खर्च केले, त्या शाहु फूले व आंबेडकर यांच्या नावाने सन 2006-07 पासून दलित वस्ती विकास व सुधारणा अभियान दरवर्षी संपूर्ण राज्याच्या ग्रामीण भागात राबविण्यात येते. या अभियांना अंतर्गत ज्या ग्रामपंचायती हिरीरीने सहभागी होवून उत्कृष्ट कार्य करतील अशा ग्रामपंचायतींना पूरस्कार प्रदान करुन त्यांचा गौरव करण्यात येतो.
पारितोषिकांची रक्कम |
अ.क्र. |
पुरस्कार स्वरुप |
पंचायत समिती स्तर |
जिल्हा स्तर |
महसुल विभाग स्तर |
राज्यस्तर |
1 |
प्रथम पुरस्कार |
25 हजार |
5 लाख |
प्रत्येक विभागातून प्रथम येणाऱ्या |
25 लाख व सुवर्ण पदक |
2 |
द्वितीय पुरस्कार |
15 हजार |
3 लाख |
दलित वस्ती पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीला |
15 लाख |
3 |
तृतीय पुरस्कार |
10 हजार |
2 लाख |
10 लाख रक्कम देण्यात येते. |
12.50 लाख |
|