योजनेचे स्वरुप :
- खाजगी विनाअनुदानित व कायम विना अनुदानित शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 10 वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या दारिद्गय रेषेखालील कुटूंबातील अनुसूचित जाती, विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व शुल्काची प्रतिपूर्ती केली जाते.
- नियम, अटी व पात्रता इ. :
- विद्यार्थी हा दारिद्गय रेषेखालील कुटूंबातील अनुसूचित जाती, अनु.जमाती, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील असावा
- शिक्षण शुल्क परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती संबंधीत शाळांना केली जाते, त्याचे दर खालील प्रमाणे आहेत..
1) इयत्ता 1 ते 4 थी प्रतिमाह 100/- प्रमाणे 10 महिनेसाठी 1000/- रुपये.
2) इयत्ता 5 ते 7 वी प्रतिमाह 150/- प्रमाणे 10 महिनेसाठी 1500/- रुपये.
3) इयत्ता 8 ते 10 वी प्रतिमाह 200/- प्रमाणे 10 महिनेसाठी 2000/- रुपये.
|