योजनेचे स्वरुप :
- मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांचा शिक्षणक्रम पूर्ण करता यावा, ग्रामीण भागात मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शाळा गळतीचे प्रमाण कमी व्हावे, आर्थिक दुरावस्थेमुळे पालकांना मुलांच्या शिक्षात अडचणी येऊ नयेत व विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकास व्हावा या उद्देशाने ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
- समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, लातूर अंतर्गत एकूण 108 वस्तीगृह कार्यरत असून त्यामध्ये 4803 विद्यार्थ्यांचे निवास / योजनाचा विनामुल्य सोय केली जाते. यासाठी शासनामार्फत स्वयंसेवी संस्थांना प्रति विद्यार्थी प्रतिमहा रु. 900/- प्रमाणे अनुदाने दिले जाते व अधिक्षक यांना रु. 8000/-, स्वयंपाकींना रु. 6000/-, मदतनीस रु. 5000/-, पहारेकरी यांना रु. 5000/- असे प्रतिमहा मानधन अदा केले जाते. इमारत भाड्यापोटी, सा. बांधकाम विभागाने प्रमाणित केलेल्या भाडयाच्या 75% अनुदान संस्थेस देण्यात येते.
- नियम, अटी व पात्रता इ. :
- 1) विद्यार्थी मागासवर्गीय प्रवर्गातील असावा. (विहित टक्केवारी नुसार प्रवेश)
- 2) 1 ली ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल.
- 3) वसतिगृह प्रवेशासाठी विद्यार्थ्यारचे आधार कार्ड असणे आवश्येक.
- 4) विद्यार्थी महाराष्ट्रि राज्या्तील रहिवाशी असावा.
|