लेखा व वित्त विभाग,जिल्हा परिषद लातुर आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
श्री.ए.जी.चाटे
मुख्य लेखा व वित्त अधिकारी,वित्त विभाग,जिल्हा परिषद लातुर

प्रस्तावना

नागरिकांची सनद याचा अर्थ कार्यालयाने किंवा विभागाने दिलेल्या सुविधा किंवा सेवा यांची सूची आणि सेवा सर्व सामान्य जनतेला पुरविण्यासाठी असलेली कालमर्यादा असा आहे पंचायत राज संस्थे मध्ये जिल्हा परिषद हि मुख्य व महत्वाची स्थानिक स्वराज्य संस्था असून या संस्थेच्या अखत्यारीत वित्त विभाग हा अत्यंत महत्वाचा विभाग आहे. या विभागामार्फत शासनाकडून प्राप्त होणारा निधी कोशागारामार्फत काढणे, तो जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना त्यांचे मागणीप्रमाणे वितरीत करणे, त्य्नाच्या जमा खर्चाच्या नोंदी ठेवणे, जिल्हा परिषदेमधून निवृत्त होणा-या कर्मचा-याना सेवानिवृत्ती वेतन व इतर लाभांचे शोधन करणे, कर्माचा-यांचे भ.नि. निधी तसेच दिनांक ३१/१०/२००५ नंतर नियुक्त कर्माचा-यांचे अंशदायी निधी इ. लेखे ठेवणे. जिल्हा परिषद, वित्त विभागातील कामावर नियंत्रण ठेवण्याकरिता त्याच्या आस्थापानाविषयक तसेच इतर दैनदिन बाबी हाताळण्याचे काम केले जाते.

 

वित्त विभाग व त्याच्या अधिनस्त असलेल्या यंत्रणेची रचना

विभागाचा दुरध्वनी क्रमांक
02382245330
विभागाचा ईमेल

cafofdzplatur@gmail.com

No Image
अ.क्र
धारण केलेले पद
पुरविली जाणारी सेवा
पूर्तता करण्यास लागणारा कालावधी
सेवा विहित कालावधीत पुरविली व गेल्यास ज्याचे कडे तक्रार करता येईल तो अधिकारी
1 2 3 4 5
1 मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, लातुर विभागाकडून प्राप्त नस्त्या व देयाकांना मंजुरी / शिफारस करणे सात दिवस मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. लातुर
2 वरिष्ठ लेखा अधिकारी वर्ग -१ सेवा निवृत्ती वेतन प्रकरणास मंजुरी देणे भ.नि.निधी परतावा न परतावा देयाकांना मंजुरी देणे १ महिना १५ दिवस मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. लातुर
3 लेखाधिकारी 1 वर्ग -2 स.ले.अ. कडून आलेली शिक्षण लघुसिंचन, मा.ब.क., पशुसावर्धन, आरोग्य, कृषी विभाग संबंधी देयके प्रकरणे. सात दिवस मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. लातुर
4 लेखाधिकारी 2 वर्ग -2 स.ले.अ. कडून आलेली बांधकाम पंचायत समाजकल्याण साप्रवि, भ.नि.निधी, वेतन निश्चिती इ. योजने संबंधी देयके सात दिवस मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. लातुर
संकेतस्थळ निर्मिती व देखभाल -सामान्य प्रशासन विभाग,जिल्हा परिषद,लातुर © 2015