जि. प. निधी योजना
योजनेचे स्वरुप :
 • 50% अनुदानावर पिक संरक्षण औजारे/औषधे, सुधारित कृषि औजारे, कडबाकुट्टी यंत्र, प्लास्टिक क्रेटस्, डिझेल/पेट्रोकेरोसिन स्प्रेपंप /विद्युत मोटार, पंपसंच, पीव्हीसी पाईप व ताडपत्री इ. औजारे पुरवठा करणे.
 • लाभार्थी निवडीबाबतचे निकष :
 • 1) शेतकर्यांाचे नावे शेत जमीन असावी.
 • 2) शेतकरी अल्प / अत्यल्प भू-धारक/ महिला / मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थी निवडले जातात
 • आवश्यक कागदपत्रे:-
 • 1) संबंधीत तालुक्याच्या गट विकास अधिकारी यांचेकडे अर्ज करावा
 • 2) जमीन धारणेचा 7/12 किंवा 8 अ चा उतारा
 • 3) कडबाकुट्टी यंत्र व विद्युत मोटार यासाठी वीजबील झेरॉक्स प्रत आवश्यक
 • लाभार्थीची निवड पध्दत

शेतकर्याने गट विकास अधिकारी यांचेकडे कागदपत्रासह अर्ज करावा. कागदपत्रांची तालुका पातळीवर छाननी झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी गट विकास अधिकार्याकमार्फत कृषि विकास अधिकारी यांना सादर केली जाते. सदर यादी कृषि विषय समिती सभेमध्ये मंजूरी घेवून कृषि निविष्ठा/औजारे दर करार पत्रकानुसार एम ए आय डी सी / एम एस एस आय डी सी / डी एम ओ पुरवठादार संस्थेना पुरवठा आदेश देवून कृषि निविष्ठा/औजारे गट पातळीवर पुरवठा केला जातो.

 • प्रत्यक्ष मदत/साध्यता-
 • 1) ताडपत्री
 • 2) पीव्हीसी पाईप
 • 3) किटक व बुरशीनाशक औषधे
 • 4) डिझेल/पेट्रोकेरोसीन/विद्युत मोटार पंपसंच
 • 5) नॅपसॅक /एचटीपी/पॉवर स्प्रे पंप
 • 6) इलेक्ट्रीक कडबाकुट्टी यंत्र
 • 7) सायकल कोळपे
 • 8) 51, 9 व 6 इंची नांगर
 • 9) सारायंत्र.
 • 10) प्लॉस्टिक क्रेटर्स
 • 11) सुधारित विळे

शेतकऱ्यांना उपरोक्त बाबींच्या खरेदी किंमतीच्या 50% अनुदानावर लाभ दिला जातो.

लाभार्थी हिस्सा –
 • योजनानिहाय अनुदान वजा जाता 50% लाभार्थी हिस्सा.
 • कार्यवाही –
 • जिल्हा परिषद निधीतून शेतकर्यांाना पंचायत समिती स्तरावर 50% अनुदानावर कृषि औजारे व साहित्याचे वाटप केले जाते.