डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना
योजनेचे स्वरुप :
  • अनुसूचित जाती /नवबौध्द शेतक-यांसाठी विशेष घटक योजना पुर्नविलोकन करून नव्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना दिनांक 5 जानेवारी 2017 पासून सुरू करण्यात आली आहे.
  • लाभार्थी निवडीबाबतचे निकष :
  • 1)जमीनधारणा ०.४० ते ६.०० हेक्टर , जातीचे प्रमाणपत्र ,उत्पन्नचा दाखला रु.५००००/- पर्यंत (तहसिलदार यांचा) दारिद्गय रेषेखालील शेतक-यांसाठी उत्पन्नाची अट नाही,ग्रामसभा ठराव कुटुंबातील व्यक्ती शासकिय, निमशासकिय सेवेत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र (ग्रामसेवक यांचे) .
  • योजने अंतर्गत समाष्टि बाबीः:-
  • नविन विहिर ( रु.2.50 लक्ष/- अनुदान मर्यादा) , , पंपसंच (अनुदान मर्यादा रु 25000/-),विज जोडणी रू 10000/- असे एकूण 2.85 लक्ष पॅकेज स्वरूपात व एक तुषार व ठिबकसिंचन संच देण्याचे प्रस्तावित केले आहे. तसेच ज्या लाभार्यिाकडे विहिर आहे अशा लाभार्थीस विुत पंप संच रू 25000/- व विज जोडणी साठी रू 10000/- व ठिबक/तुषार संच देणे प्रस्तावित आहे.

मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत शेततळे घेतलेल्या लाभार्थ्यांस प्लॅस्टीक अस्तरी करणास 100 टक्के अनुदान रू 1.00 लक्ष मर्यादेपर्यंत देणे प्रस्तावित केले आहे. उत्तपन्न मर्यादा : - सदरील योजनेत लाभार्थी उत्तपन्न मर्यादा रू 1.50 लक्ष आहे. .