अ) सौरपथदिवे
 • सौरपथदिव्याचे तांत्रिक मापदंड खालील प्रमाणे आहेत. मानवाच्या विकास व उन्नती मध्ये विद्युत ऊर्जेला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. सद्यस्थितीमध्ये विज निर्मिती करण्यासाठी आवश्यक असलेले कोळसा ,तेल,नैसर्गिक वायु इ. पारंपारिक इंधन साठे दिवसे दिवस कमी होत चालले आहेत.उद्योग,ऊर्जा व कामगार विभागमहाराष्ट्र शासन यांचेकडील शासन निर्णयानुसार नविन व नित्यनुतनशिल ऊर्जा साधनाचा(अपारंपारिक ऊर्जा) कार्यक्रम राबविणेचे दृष्टीने धोरण जाहीर केले.
 • अ) सौर मोडयुलची क्षमता -74 वॅट :
 • ब) बॅटरीची क्षमता - 12 व्होल्ट,75 ऐ.एच.
 • क) आवश्यक इलेक्ट्रॉनिक्स
 • ड) एम.एस.पोल जमिनी पासून 4 मीटर उंच.
 • सौरपथदिव्याचे कार्य
 • सौर संकलकामध्ये सुर्य प्रकाशाची डी.सी.विद्युत उर्जेत रुपांतर होते.
 • ही रुपांतरित ऊर्जा सौर बॅटरी चार्ज करणेसाठी वापरली जाते.
 • या बॅटरीवर एक सी.एफ.एल ची टयूब चालते
 • या टयूब संध्याकाळी (सुर्यास्तानंतर) आपोआप चालू होतात आणि सकाळी(सुर्योदयानंतर)आपोआप बंद होतात.
 • हिरवा दिवा बॅटरीचे चांर्जिग पूर्ण झाल्यानंतर थोडा वेळ चालू बंद होतो व नंतर बंद होतो.
 • बॅटरी डिसचार्ज झाली असेल किंवा चार्जिंग कमी असेल तर लाल दिवा लागतो आणि चार्जिंग पूर्ण झालेनंतर लाल दिवा बंद होतो.
 • सौर पथदिवे वापरण्यासंबंधी मार्गदर्शक सुचना:
 • सौर पथदिव्याच्या बॅटरीची काही प्रमाणात देखभालीची गरज असते.
 • सौरपथ दिव्याच्या नियंत्रका मध्ये बिघाड झाल्यास त्याची दुरुस्ती अधिकृत तज्ञाकडूनच करुन घ्यावी.
 • सी.एफ.एल. दिवा नादुरुस्त झाल्यास सी.एफ.एल. टयूब वरील कव्हर काढून टयूब बदलता येवू शकते. परंतु टयूब 4 पिनचीच असावी.
 • सौरसंच निगा व देखभाल
 • सौर संकलक (पॅनेल) काचेवर हवेमध्ये असलेली धूळ साचते व धूळीच्या थरामुळे सौर ऊर्जा सौरसेल्स पर्यत कमी प्रमाणात पोहचते.त्यामुळे ऊर्जा निर्मीतीचे काम बंद होते. व बॅटरी डिस्चार्ज होण्याची शक्यता असते. त्यामुळे दर 15 दिवसांनी सौर पॅनल वरची धूळ कपडयाने किंवा पाण्याने साफ करणे गरजेचे आहे.
 • सौर फोटोवोल्टीक पॅनलला नेहमी स्वच्छ सूर्यप्रकाश गरजेचे आहे. त्यावर कोणत्याही झाडाची / इमारतीची / तारेची सावली पडता कामा नये.
 • पॅनल नेहमी दक्षिण दिशेला झुकलेले असावे.
 • सौर पथदिव्यामध्ये दिलेल्या बॅटरीमध्ये दर 3 महिन्यांनी डिस्टील वॉटरची लेवल चेक करणे.गरज भासल्यास डिस्टील वॉटर टाकणे किंवा भरणे.
 • बॅटरी मध्ये जर डिस्टील वॉटर नसेल तर डिस्टिल वॉटर भरल्यावर दोन दिवसांनी बॅटरी पूर्ण पट्टीने दूर करावी. (साफ करावी) व पेट्रोलियम जेलीचा सुरक्षात्मक लेप लावावा.
 • वरील प्रमाणे सौर पथदिपाची देखभाल ही ग्राम पंचायतीने करणे आवश्यक आहे.