कृषि विभाग जिल्हा परिषद लातुर आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
 
श्री.डी.टी.सुपेकर
कृषि विकास अधिकारी,जि.प.लातुर.

प्रस्तावना.

भारत हा कृषि प्रधान देश असून कृषि हा अर्थ व्यवस्थेचा आधारस्तंभ मानला जातो. देशाच्या स्थुल राष्ट्रीय उत्पन्नात शेती क्षेत्राचा वाटा 18.5% आहे. भौमितिक पद्धतीने वाढणारी देशाची लोकसंख्या पाहता कृषि उत्पन्नामध्ये वाढ होणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, खते, औजारे, पीक संरक्षण औषधे इ. बाबी शेतकऱ्यांना माफक दरात योग्यवेळी उपलब्ध होणे व त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जाणीव-जागरुकता निर्माण करणे हे उद्दिष्ट ठेऊन व बहुजन हिताय, बहुजन सुखाय या उक्तीप्रमाणे कृषि विभाग, जिल्हा परिषद,लातूर कार्यरत आहे. लातूर जिल्हयात एकुण 10 तालुक्यांचा समावेश असून जिल्हयाचे भौगोलिक ७.१५ लक्ष हे. क्षेत्रफळ आहे त्यापैकी लागवडी लायक क्षेत्र ६.६५ लक्ष हे.असून लातूर जिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान ७३४.५५ मि,मि.आहे.

 
विभागाचा दुरध्वनी क्रमांक
02382 259233

विभागाचा ईमेल

adolatur@gmail.com
कृषि विभागाकडील योजना

अनुसूचित जाती/नवबौध्द शेतक-यांचे आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी शासनाने अनुसुचित जाती/नवबौध्द शेतक-यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, आदिवासी शेतक-यांसाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत अनुसुचित जातीव जमातीच्या शेतक-यांना पुढीलप्रमाणे घटकांसाठी पॅकेज स्वरुपात अथवा मागणीनुसार अनुदान देण्यात येईल.

 
बाब डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना
नवीन सिंचन विहीर 4,00,000/- 4,00,000/-
जुनी विहीर दुरुस्ती 1,00,000/- 1,00,000/-
शेततळ्यांचे प्लॅस्टीक अस्तरीकरण राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या प्रचलित आर्थिक मापदंड शेततळ्याचे आकारमानानुसार परिगणित होणाऱ्या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा रु.2,00,000/-यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या प्रचलित आर्थिक मापदंड शेततळ्याचे आकारमानानुसार परिगणित होणाऱ्या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा रु.2,00,000/-यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील.
इनवेल बोअरींग 40,000/- मर्यादेत 40,000/- मर्यादेत
वीज जोडणी आकार 20,000/- (किंवा प्रत्यक्ष भरलेला आकार यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील.) 20,000/- (किंवा प्रत्यक्ष भरलेला आकार यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील.)
पंपसंच (डिझेल/विद्युत) 10 अश्वशक्ती क्षमतेपर्यंत पंपसंचकरिता प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या 90% किंवा रु. 40,000/- यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील. 10 अश्वशक्ती क्षमतेपर्यंत पंपसंचकरिता प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या 90% किंवा रु. 40,000/- यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील.

सोलार पंप (वीज जोडणी

आकार पंप संच ऐवजी)
प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या 90% किंवा रु. 50,000/- यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील. प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या 90% किंवा रु. 50,000/- यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील.
एचडीपीई/पीव्हीसी पाईप अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके या योजनेंतर्गत प्रती मीटर करिता प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या १००% किंवा रु. 50,000/- यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील. अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके या योजनेंतर्गत प्रती मीटर करिता प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या १००% किंवा रु. 50,000/- यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील.

तुषार सिंचन संच

(पुरक अनुदान)
47,000/- 47,000/-

ठिबक सिंचन संच

(पुरक अनुदान)

97,000/-

97,000/-

यंत्रसामुग्री (बैलचलित

ट्रॅक्टरचलित अवजारे)

(नवीन बाब)
50,000/- 50,000/-
परसबाग 5,000/- 5,000/-
विंधन विहीर (नवीन बाब)  ----------- 50,000/- किंवा प्रत्यक्ष खर्च यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील. (फक्त वनक्षेत्रातील आदिवासी शेतक-यांना)

नविन राष्ट्रीय बायोगॅस सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रम सन 2024-25

बायोगॅसचे फायदे
🌱 बायोगॅसचे फायदे 🌱
अ.क्र. फायदे
1 बायोगॅस घरगुती वापरासाठी प्रदूषण विरहीत इंधन म्हणून उपयुक्त.
2 प्रकाशासाठी व विद्युत दिवा लावण्यासाठी देखील उपयुक्त.
3 वृक्ष तोड कमी होते, प्रदूषणाचा त्रास कमी होतो व पर्यावरणाचे संवर्धन होते.
4 उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत तयार होते, त्यामुळे रासायनिक खताची बचत व जमिनीचा पोत सुधारतो.
5 धुरामुळे होणारा त्रास टाळता येतो, त्यामुळे महिलांच्या आरोग्याची हानी टाळता येते.
6 इतर इंधनाची बचत होते, त्यामुळे खर्चात कपात होते.
 
बायोगॅस संयंत्र अनुदान
बायोगॅस संयंत्रासाठी अनुदान
प्रवर्ग 1 घ.मी. 2 ते 4 घ.मी. 6 घ.मी. 8 ते 10 घ.मी. 15 घ.मी. 20 ते 25 घ.मी.
सर्वसाधारण रु.9800/- रु.14350/- रु.22750/- रु.23000/- रु.37950/- रु.52800/-
अनुसूचित जाती/जमाती रु.17000/- रु.22000/- रु.29250/- रु.34500/- रु.63250/- रु.70400/-

⚡ संयंत्रास शौचालय जोडल्यास अतिरिक्त अनुदान रु.1600/- अनुज्ञेय राहील.

 
📄 लाभार्थी निवडीसाठी आवश्यक कागदपत्रे
अ.क्र. कागदपत्राचे नाव
1 biogas.mnre.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक.
2 लाभार्थ्याच्या नावावर ७/१२, ८ अ खाते उतारा असावा.
3 आधारकार्ड झेरॉक्स.
4 पशुधन असले बाबतचा दाखला.
5 ग्रामसेवकाचा रहिवासी दाखला.
6 संयंत्र बांधकामासाठी जागा उपलब्ध असावी.
7 आधार लिंक असलेले बँक पासबुकची छायांकित प्रत.