कुपोषित मुला-मुलींसाठी अतिरिक्त आहार.
  • ग्रामीण / आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी कुपोषित मुलांना अंगणवाडया मार्फत मुला-मुलींसाठी दुप्पट आहार दिला जातो. तथापि कुपोषण कमी करण्यासाठी तो पुरेसा नसलेने कुपोषित मुलांना अंगणवाडीत पुरविणेंत येणाऱ्या आहारा व्यतिरिक्त आहार म्हणून अंगणवाडीत मुलांना Micronutrient Supplement Syrup चा पुरवठा करणेची योजना खालील अटी-शर्ती नुसार राबविणेंत येत आहे.
  • प्रकल्पांकडून लगतच्या महिन्याचा कुपोषित बालकां बाबत अहवाल प्राप्त करुन घेउन त्या नसार Micronutrient Supplement Syrup किंवा कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक अशा खाद्य / औषधे यांचा पुरवठा 100 टक्के अनुदानावर करावा.
  • प्रत्यक्ष मात्रा देतांना आरोग्य विभागाकडील स्थानिक कर्मचारी / अधिकारी यांचा सल्ला व मार्गदर्शन घेणे बाबत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे मार्फत सर्व सबंधितांना सूचना द्याव्यात.