महिला व बाल कल्याण विभाग,जिल्हा परिषद लातुर आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
 
श्री.जे.एस.शेख
उपमुख्य कार्यकारी अधिकारी,महिला व बाल कल्याण विभाग,जि.प.लातुर.

प्रस्तावना

केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्यात प्रथम 2 ऑक्टोंबर, 1975 रोजी अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात सुरु होवून टप्याटप्याने संपुर्ण राज्यात लागु करण्यात आली आणि लातुर जिल्ह्यात सदर योजना सन 1980-81 पासुन कार्यान्वीत झालेली आहे. केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके , गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, 11 ते 18 वयोगटातील किशोरी मुली तसेच 15 ते 45 वयोगटातील महिला यांच्या विविध कार्यक्रमातुन लाभार्थी म्हणुन समावेश आहे.

विभागाचा दुरध्वनी क्रमांक
02382 255708

विभागाचा ईमेल

dycoicdslatur@gmail.com
योजनेची ठळक उद्दीष्टे खालील प्रमाणे आहेत.
  • 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांचा पोषण आहार विषयक दर्जा सुधारणे
  • मुलींना योग्य मानसिक शारीरीक व सामाजीक विकासाचा पाया घालणे.
  • बालमत्यू, मुलींचा रोगटपणा, कुपोषण व शाळेतील गळती यांचे प्रमाण कमी करणे.
  • मातांना पोषण आहार विषयक शिक्षण देवून मुलींचे सर्वसाधारण आरोग्य आणि पोषण आहार या संबंधी मुलींची अधिक चांगली काळजी घेण्याबाबतची त्यांची क्षमता वाढविणे.
  • बाल विकासास चालना मिळावी म्हणुन विविध खात्यांमध्ये धोरण अंमलबजावणी या बाबत प्रभावी समन्वय घडवून आणणे.
पुरवण्यात येणाऱ्या सेवा
  • पुरक पोषण आहार
  • आरोग्य तपासणी
  • लसिकरण
  • संदर्भ सेवा
  • अनौपचारीक पुर्व शालेय शिक्षण
  • पोषण, आरोग्य व आहार शिक्षण
प्रशिक्षण व सक्षमीकरण योजना.

गट ब च्या योजना (वस्तू खरेदीच्या योजना).

संकेतस्थळ निर्मिती व देखभाल -सामान्य प्रशासन विभाग,जिल्हा परिषद,लातुर © 2015