सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना.
योजनेचे स्वरुप :
  • इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिकणार्याफ अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इ. 8 वी ते 10 वी मध्ये शिकणार्या अनुसूचित जातीच्या मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने अनुक्रमे सन 1996 व 2003 पासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे.
अ.क्र. इयत्ता शिष्यवृत्ती दर कालावधी
1 5 वी ते 7 वी दरमहा रु. 60/- प्रमाणे रु.600/- एकूण 10 महिने
2 8 वी ते 10 वी दरमहा रु.100/- प्रमाणे रु.1000/- एकूण 10 महिने
  • नियम, अटी व पात्रता इ. :
  • 1) उत्पन्न व गुणाची अट नाही.
  • 2) संबंधित शाळेच्या मुख्याणद्यापकांनी विद्यार्थ्यांबचे अर्ज ऑनलाईन भरणे आवश्येक.
  • 3) 75% उपस्थिती असल्यास शाळेने प्रस्ताव विहीत कालावधीत सादर करावा.
  • 4)लाभधारक मुलगी शासनमान्य शिक्षण संस्थेत नियमित शिकत असावी. सदर शिष्यवृत्तीची रक्कम त्या त्या मुलींच्या बँकेतील खात्यामध्ये/ ऑनलाईन जमा करण्याषत येते.