औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अनुसूचित जातीच्या प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन.
योजनेचे स्वरुप :
  • अनु. जातीच्या विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देवून त्यांना विविध क्षेत्रात व्यावसायिक संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना लागू आहे.
  • 1) अनुसूचित जातीच्या लाभधारक विद्यार्थ्यांना दरमहा रु. 100/- प्रमाणे 10 महिन्याला रु. 1000/- विद्यावेतन दिले जाते.
  • 2) ज्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण विभागाकडून रु. 40/- विद्यावेतन मिळते अशा विद्यार्थ्यांला सामाजिक न्याय विभागाकडून रु. 60/ प्रतिमहा विद्यावेतन देण्यात येते.
  • नियम, अटी व पात्रता इ. :
  • 1) सदर योजना शासकिय मान्य्ताप्राप्त् शाळेत शिकत असणा-या विद्यार्थ्यांसाठी लागु राहील.
  • 2) विद्यार्थी हा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशित असावा व नियमितपणे हजर असावा.