आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन व अर्थसहाय्य.
योजनेचे स्वरुप :
  • समाजातील जातीयता नष्ट व्हावी म्हणून आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबविली जाते. यामध्ये केंद्गस्तर 50 टक्के व राज्यस्तर 50 टक्के हिस्सा याप्रमाणे एकूण रु. 50000/- एवढे अर्थसहाय्य विवाहीत जोडप्यांना दिले जाते.
  • नियम, अटी व पात्रता इ. :
  • या योजनेमध्ये एक व्यक्ती मागासवर्गीय व दुसरी व्यक्ती सवर्ण हिंदू, लिंगायत, जैन, शीख यामधील असावा. तसेच मागासवर्गीयातील अनु. जाती व जमाती विमुक्त जाती / भटक्या जमाती यामधील आंतर प्रवर्गामधील आंतरजातीय विवाहीतांनाही याचा लाभ दिला जातो.