लघु पाटबंधारे विभागांतर्गत 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षमतेच्या योजना
  • गाव तलाव व पाझर तलाव :- गाव तलाव /पाझर तलावाची कामे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडून केली जातात. सदरील कामे पूर्वी रोजगार हमी योजने तून घेण्यात येत होती. सद्यस्थितीतमध्ये सदरील कामे जिल्हा वार्षीक नियोजन अंतर्गत 2702-6336 ल.पा. कामे या लेखा शिर्षाखालील वितरीत निधीमधून घेण्यात येतात
  • गाव तलाव / पाझर तलावाची कामे मुख्यतः जलसंधारणासाठी घेतली जातात. एखाद्या ठिकाणी जलशास्त्रीय आकडे मोडीनुसार त्याठिकाणी जमा होणारा पाणी येवा लक्षात घेऊन त्यापैकी किती पाणी साठविले जाऊ शकते याचा अंदाज तेथील भौगोलीक रचना पाहून ठरविण्यात येते. गाव तलावाची कमाल साठवण क्षमता 2 द.ल.घ.फु. घेण्यात येते. व 2 ते 5 द.ल.घ.फु. साठवण क्षमतेचे पाझर तलाव घेण्यात येतात.
  • गाव तलाव / पाझर तलावात साठविलेले पाणी जमिनिखाली भुगर्भात जिरते त्यामुळे भुजल पातळी वाढून तलावाखाली विहिरीच्या पाणी पातळीत वाढ होते. व या विहिरीव्दारे होणा-या सिंचन क्षेत्रात वाढ होते. पर्यायाने शेती उत्पन्न वाढवून शेतक-याच्या आर्थीक विकास होतो. शेतक-याचा आर्थीक विकास म्हणजेच पर्यायाने राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. .