जलयुक्त शिवार अभियान
  • महाराष्ट्र राज्यात पिकाच्या एैन वाढीच्या काळात पावसाची अनियमितता, व पावसातील खंड यामुळे सतत पाणी टंचाई सद्रश्य परिस्थिती निर्माण होउून, त्याचा मोठा परिमान राज्याच्या कृषी क्षेत्रावर होत आहे. तसेच मागील 5 वर्षापासून, वार्षीक सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान होत असल्यामुळे, दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. कमी पाउूस पडत असल्यामुळे, पाणी टंचाई व दुष्काळास जनतेला सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीस पाण्याची कमी उपलब्धता हा घटक कारणीभूत आहे.
  • शाश्वत शेतीसाठी पाणी व पिण्याच्‍या पाण्यासाठी कायमस्वरूपी मात करण्यासाठी, प्रत्येक गावात पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी जलसंधारणांतर्गत उपाययोजना करून, भूगर्भातील पाणी पातळीत वाढ होउून, कायम स्वरूपी पाणी टंचाई निवारण करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत, पाणी आडवा पाणी जिरवा, हा उपक्रम राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे.
  • या अभियानासंदर्भात तसेच अमलबजावणी बाबत निर्णय घेणे / गावांची ‍निवड करणे / कृती आराखडा तयार करणे / कामांना मान्यता देणे / कार्यक्रमाची अमलबजावणी करणे / सनियंत्राण व समन्वय करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे.
  • सदर समितीचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी हे सहअध्यक्ष असून मा. जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी हे सदस्य सचिव आहेत.
  • जलयुक्त शिवार अभियानाचा उददेश:-पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावाचे शिवारात अडविणे. भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे. अस्तित्वातील जलस्त्रोतामधील गाळ लोकसहभागातून काढून जलस्त्रोतांचा पाणी साठा वाढविणे. राज्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करणे. वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देवून वृक्ष लागवड करणे.
जलयुक्त शिवार अभियान या कार्यक्रमांतर्गत खालील कामे या विभागामार्फत करण्यात येत आहेत
  • लोकसहभागातून प्रकल्पातून गाळ काढणे. नदी नाले यांचे खोलीकरण - रुदीकरण करणे.
  • सिंचन तलाव / पाझर तलाव / गाव तलाव / को.प.बंधा-याची दुरूस्ती करणे
  • सिमेंट नाला बांध दुरुस्ती, गॅबीयन बंधारे बांधकाम करणे काम
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामामुळे होणारे फायदे
  • शेतीसाठी व पिण्याचे पाणी उपलब्धतेत वाढ होत आहे
  • प्रकल्पाच्या जलाशयात पाणी साठवण क्षमतेत पुर्नस्थापना होत असल्यामुळे, भूगर्भातील पाणीपातळीत वाढ होत आहे.
  • सिंचन क्षमता वाढल्याने सिंचन क्षेत्रात वाढ झाली, त्यामुळे शेतक-यांचे सामाजिक व आर्थीक स्तर उंचावणार आहे पर्यायाने राष्ट्रीय उत्पंन्नात वाढ होत आहे.
  • प्रकल्पातील गाळ कमी प्रतीच्या जमीनीवर टाकल्यामुळे त्या जमीनीच्या दर्जा व गुणत्तेत वाढ होत आहे.