लघु सिंचन / ग्रामीण पाणी पुरवठा विभाग,जिल्हा परिषद लातुर आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
 
श्री.बी.आर.शेलार
कर्यकारी अभियंता(ल.पा/पा.पु)
ज़िल्हा परीषद लातूर

प्रस्तावना.

लघु सिंचन / ग्रामीण पाणी पुरवठा विभाग हा जिल्हा परिषद लातुर येथील एक महत्वपुर्ण विभाग असून या विभागाअंतर्गत उदगीर व औसा,येथे लघु सिंचन उपविभाग मंजुर आहेत. तसेच लातूर, रेणापूर, अहमदपूर, देवणी, जळकोट, निलंगा येथे ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाचा समावेश आहे.त्याच प्रमाणे उपअभियंता (यांत्रीकी) व उप अभियंता देखभाल दुरस्तीकक्षाचा ही समावेश या विभागात करण्यात आलेला आहे. सदर उपविभागाचे अंतर्गत राजशिष्टाचार, रचना व कार्यपध्दती, योजनानिहाय विकास कामे, तसेच आस्थापना विषयक बाबींचा समावेश आहे. लघु सिंचन / ग्रामीण पाणी पुरवठा विभागामध्ये तांत्रिक, लेखा तसेच आस्थापना विषयक कामे होतात. लघु सिंचन / ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला जिल्हा विकास नियोजन समिती आणि विकास कार्यक्रमांतर्गत शासकीय अनुदान प्राप्त होत असून यामधून उपविभागाअंतर्गत ग्रामीण भागात प्रामुख्याने बंधारे, तलाव, सिंचन विहिरी, ग्रामीण पाणी पुरवठा इत्यादी योजनानिहाय विकास कामे केली जातात. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी हे ग्रामीण पाणी पुरवठा या योजनांचे विभाग प्रमुख असून, तसेच मा. अति. मुख्य कार्यकारी अधिकारी हे लघु सिंचन या योजनांचे विभाग प्रमुख असून, कार्यकारी अभियंता हे कार्यालय प्रमुख आहेत. कार्यकारी अभियंता यांचे अधिपत्याखाली सहा. कार्यकारी अभियंता, अधिक्षक, सहा. लेखा अधिकारी, शाखा अभियंता व इतर आस्थापना लिपीक व परिचर इत्यादी अधिकारी कर्मचारी आहेत. या प्रशासकीय अधिकायाकडे एकूण १६ कार्यासनामध्ये या विभागाकडील सर्व विषयांची विभागणी करण्यात आलेली आहे.

 
विभागाचा दुरध्वनी क्रमांक
02382 245303

विभागाचा ईमेल

eebnatur@rediffmail.com
ज्या गावातील पाण्याचे उद्‌भव गुणवत्ता बाधीत झालेल्या आहेत.अशा गावांना शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यासाठी खालील योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

नियम/शासन निर्णय :-या विभागाशी संबंधित नियम अथवा महत्वाचे शासन निर्णय महाराष्ट्‌ शासनाचे ग्राम विकास विभाग, वित्त विभाग,तसेच जलसंधारणविभाग यांचेकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येतात याबाबतची माहिती महा.शासनाचे वेबसाईटवर उपलब्ध आहे.

गाहाणी/तक्रारी यांचे निराकरण :-कार्यपुर्तीस होणारा विलंब वा अन्य काही गाहाणी असल्यास.त्यासंबधी कार्यकारी अभियंता, जि.प.लातुर यांचेकडे तकार नोंदविता येईल. व तक्रार प्राप्त झाल्यापासून ७ दिवसात त्याची पुर्तता करण्याची जबाबदारी संबंधित अधिकायाची राहील. यानंतरही नागरिकांचे समाधान न झाल्यास संबंधित मा. अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.लातुर यांचेकडे याबाबत त्यांना तक्रार करता येईल. गाहाणी समक्ष भेटीत/पञाने तथा ई मेलद्वारेही मांडता येईल.

लघु सिंचन / ग्रामीण पाणी पुरवठा विभाग प्रमुखाचे अधिकार व कामे:-.

  • १. आपल्या विभागाशी संबंधित असलेल्या कामांच्या व विकास कामांच्या बाबतीत तांत्रिक मंजूरी देतील
  • २. पत्येक वर्षी, आपल्या विभागात काम करणाया वर्ग दोनच्या सेवेतील अधिकायांच्या कामांचे मूल्यमापन करील आणि त्यााबाबतचे आपले मत गोपनीयरीत्या अति. मुख्य कार्यकारी अधिकायाकडे पाठवील.
  • ३. वर्ग २, ३ व वर्ग ४ चे कर्मचायांवर नियंत्रण ठेवणे

कर्मचारी यांचे कर्तव्य:-

  • १. कार्यसुचीनुसार दिलेली कामे वेळीच पार पाडणे.
  • २. अधिकायांनी सोपविलेली कामे जबाबदारीने व नियमानुसार पार पाडणे.

योजना बाबतः ग्रामीण पाणी पुरवठा विभागः ग्रामीण भागाचा पिण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शानाच्या मागणी आधारित धोरणांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत नळ पाणी पुरवठा योजना व विंधन विहीरी या सारख्या उपाय योजना या विभागामार्फत राबविल्या जातात.

    ग्रामीण पाणी वुरवठा कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शासन निर्णयान्वये मागणी आधारीत लोकसहभागाचे लोकाभिमूख धोरण स्विाकारले आहे. या धोरणानुसार ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनांची मागणी,आखणी,अंमलबजावणी व देखभाल दुरुस्ती संबधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावयाची आहे. तसेच ही कार्यवाही जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समीतीच्या माध्यामातून करण्यात येते.तसेच ज्या गावातील पाण्याचे उद्‌भव गुणवत्ता बाधीत झालेल्या आहेत.अशा गावांना शुध्द पाण्याचा पुरवठा या योजनेव्दारे करण्यात येतो..

संकेतस्थळ निर्मिती व देखभाल -सामान्य प्रशासन विभाग,जिल्हा परिषद,लातुर © 2015