आरोग्य विभाग,जिल्हा परिषद लातुर आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
 
डॉ.एच.व्ही.वडगावे
जिल्हा आरोग्य अधिकारी,आरोग्य विभाग,जि.प.लातुर.

प्रस्तावना

आरोग्य विभाग जिल्हा परिषदेमधील एक महत्वपूर्ण विभाग असून जिल्हा आरोग्य अधिकारी हे या विभागाचे विभाग प्रमुख म्हणून काम पाहतात. जिल्हा परिषद मध्ये वर्ग 3 कर्मचा-यांचे सरळ सेवा भरतीच्या नेमणूका, पदोन्नती, जिल्हा बदली, नियतकालीका बदली बाबत विभाग प्रमुख नियंत्रण तथा अंमलबजावणी करतो. मा.पदाधिकारी + अधिकारी यांना वाहन उपलब्ध करून देणे. तालुका वैद्यकिय अधिकारी + वैद्यकिय अधिकारी गट अ व वैद्यकिय अधिकारी गट ब च्या अधिका-यांचे वेतन व भत्ते तथा सेवा संबंधीचे कामकाज पाहण्यात येतात. आरोग्य विभाग अंतर्गत येणारे वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचा-यांचे वेतन निवृत्ती वेतन, खातेनिहाय चौकशी सवंर्ग निहाय पदोन्नती कालबध्द पदोन्नती, गोपनिय अहवाल इत्यादी कामकाज केले जाते. तसेच सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, पल्स पोलीओ, आरोग्य सेविकांना प्रशिक्षण देणे, दुर्धर आजार, प्रधानमंत्री मातृवंदन योजना , जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, जननी सुरक्षा कार्यक्रम, मानव विकास कार्यक्रम तसेच पेन्शन अदालत, लोकशाही दिन व आस्थापना विषयी कामकाज इत्यादी बाबत कार्यवाही केली जाते. आरोग्य विभाग निहाय रचना व कार्यपध्दती तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र निरीक्षण, तपासणी व पाहणी केली जाते. सर्व सामान्य नागरिका कडून प्राप्त होणारे सर्व पत्र व्यवहार आरोग्य विभागात स्विकारले जातात. आरोग्य विभाग अंतर्गत येणा-या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रा यांना कार्यवाही करीता पाठविली जातात. आरोग्य समिती सभा, तालुका आरोग्य अधिकारी + वैद्यकिय अधिकारी गट-अ व गट-ब, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ सहायक, आरोग्य सहायक + सहायीका यांच्या सभेचे आयोजन आरोग्य विभागा मार्फत केले जाते. महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई. यांचे शासन निर्णयान्वये सरळ सेवा भरती, जिल्हा परिषद अंतर्गत् आरोग्य विभागतील कर्मचा-यांच्या बदल्याचे तसचे शासकिय कर्तव्य पार पाडतांना होणा-या विलंबास प्रतिबध्द अधिनियम 2005 मधील कलम 8 मधील तरतुदीनुसार आरोग्य विभाग नागरीकांचे सनद प्रसिध्द करीत आहे. या विभागाशी संबंधित सेवा तत्परतेने, सौजन्य पुर्वक व सन्मानपुर्वक नागरीकांना उपलब्ध करुन देण्यात हा विभाग बांधिल आहे.

विभागाचा दुरध्वनी क्रमांक
02382 242806

विभागाचा ईमेल

nhmlatur2015@gmail.com
• विज्ञानाची कास धरा, अंधश्रध्दा दुर करा.    • मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी.    • कमी मुले सुखाचा आधार, जास्त मुले कष्टाचा भार.    • नव्या युगाचा संदेश नवा, हट्ट नको मुलगाच हवा.    • जन्मा येता बाळराजा, आईचे प्रथम दुध लवकर पाजा.     • देता बाळास सर्व लसी, बाळ होईल शतायुषी.    • दोन मुलांत योग्य अंतर, बालमृत्यू घटेल तदनंतर.     • नियोजीत मातृपितृत्व, वाढविल बाळाचे कर्तृत्व.    • सुखी संसाराचे सुत्र, कन्येलाच माना पुत्र.    • जन्मल्यावर लगेच स्तनपान दया बाळाला, निरोगी जीवन मिळेल त्याला.     • प्रशिक्षीत व्यक्तीकडून होता प्रसूती, माता -मुले सुखरुप राहती.    • जन्म मृत्यूची नोंद वेळेवर करा, ते आपल्या राष्ट्राच्या हिताचे असून कायदयाने बंधनकारक आहे.     • पोलिओ लस पाजा बाळा, पोलिओ टाळा.    • जेवणापूर्वी व शौचावरुन आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवा.    • पाणी झाकून ठेवा, पाणी उंचावर ठेवा. तोटी असलेली टाकी/माठ वापरा. • योग्य वयात लग्न, हेच खरे शहाणपण.
अ.क्र
योजना
उद्देश
1राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रमराष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रमातंर्गत महिलांना कुटूंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी // लाभार्थ्यांना रुपये ६००/- व इतर लाभार्थींना रुपये २५०/- तसेच पुरुष शस्त्रक्रियेसाठी रुपये १४५१/- दिले जातात.
2प्रधानमंञी मातृवंदना योजनागरोदर व स्तनदा मातांच्या पहिल्या जीवंत अपत्यासाठी प्रथम रू. १०००/- गरोदरपणाची नोंद अंगणवाडी केंद्रात किंवा मान्यता प्राप्त आरोग्य संस्थेत केल्यास, दुसरा हप्ता रू. २०००/- गरोदरपणाच्या सहा महिन्यानंतर किमान एक प्रसुतीपुर्व तपासणी झाली असल्यास व तिसरा हप्ता रू. २०००/- बाळाच्या जन्माची नोंद झाल्यानंतर व बाळास बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी व हिपॅटायसीस-बी लसीकरण मिळाल्यानंतर लाभ देण्यात येतो.
3जननी सुरक्षा योजना ()1. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व दारिद्र रेषेखालील गरोदर महिला (वयाची व खेपेची अट नाही) यांनी 2. शासकीय/मान्यताप्राप्त खाजगी आरोग्य संस्थेत बाळंतपण केल्यास ग्रामीण भागातील महिलेस रु. ७००/- व शहरी भागातील महिलेस रु. ६००/- अनुदान देण्यात येते. 3. घरी बाळंतपण झाल्यास मातेस फक्त बी.पी.एल कुटुंबातील लाभार्थी / मातेस रु-५०० अनुदान वितरीत करण्यात येते. मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालयात सिझेरिअन झाल्यास रु. १५००/- अनुदान देण्यात येते. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत प्रा.आ.केंद्ग व उपकेंद्ग स्तरावर तसेच खाजगी मानांकित रुग्णालयामध्ये बाळंतपणाच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. प्रसुती सेवा उपलब्ध असलेल्या खाजगी प्रसुती गृहाची जिल्हा आरोग्य सोसायटी मार्फत तपासणी करुन अशा संस्थाना मानांकन प्रमाणपत्र व जननी सुरक्षा योजनेबद्दलचे फलक वितरित करण्यात आलेले आहेत. .
4जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम ()• जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम सर्व शासकीय आरोग्य संस्थेत राबविला जातो. या कार्यक्रमात मातेच्या गरोदरपणात, प्रसुतीच्या वेळी व प्रसुती पश्चात ४२ दिवसापर्यंत तसेच एक वर्षापर्यंतच्या बालकास आरोग्य सेवा दिली जाते. या कार्यक्रमातंर्गत सर्व सेवा मोफत दिल्या जातात. • मोफत प्रसुती तसेच सिझेरियन शस्त्रक्रिया • प्रसुती संदर्भातील औषधे व लागणारे साहित्य मोफत पुरविणे. • प्रयोगशाळेतील आवश्यक त्या तपासण्या मोफत देणे. • प्रसुती पश्चात मातेला मोफत आहार देणे. • मोफत रक्त संक्रमण • गरोदर माता/बालकास घर ते आरोग्य संस्था, एक आरोग्य संस्था ते दुसरी आरोग्य संस्था, संस्थेतून घरी पोहोचविण्याकरीता मोफत वाहन व्यवस्था. शासकीय आरोग्य संस्थेमध्ये गरोदर माता/बालकास कोणतीही फी आकारण्यात येणार नाही. या कार्यक्रमातंर्गत पुणे येथे कॉल सेंटर स्थापन करण्यात आलेले आहे. १०२ व १०८ या क्रमांकावर फोन केल्यास २४ तास मोफत अॅ म्बुलन्सची सेवा गरोदर मातेस व अर्भकास उपलब्ध केली जाते. या कार्यक्रमाबाबत काही तक्रारी असल्यास प्रत्येक प्रा.आ.केंद्ग/ग्रा.रु. /उप.जि.रु./जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांना तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकारी यांना तक्रार निवारण अधिकारी म्हणून घोषित केले आहे.
5आयुष () = आयुर्वेद = योग व निसर्गोपचार, = युनानी, = सिध्द, = होमियोपॅथी आयुष कार्यक्रमातंर्गत पारंपारिक भारतीय उपचार पध्दतींचा सार्वजनिक आरोग्य सेवेत समावेश करण्यात आलेला आहे. उपजिल्हा रुग्णालय उदगीर, निलंगा; ग्रामीण रुग्णालय औसा, मुरुड, बाभळगांव, अहमदपूर, चाकूर, कासारशिरसी येथे आयुर्वेदिक, होमियोपॅथिक, युनानी तज्ञ कंत्राटी स्वरुपात नेमण्यात आलेले आहेत. स्त्री रुग्णालय, लातूर येथे आयुर्वेद तज्ञ, योग व निसर्गोपचार तज्ञ, मसाजिस्ट (स्त्री) कंत्राटी स्वरुपात नेमण्यात आलेले आहेत. यांच्यामार्फत आयुष सेवा (बाह्य रुग्ण, आंतररुग्ण सेवा, पंचकर्म, योग, इलाज-बिद्‌- तदबीर उपचार) जनतेस दिल्या जातात. जि.प. आयुर्वेदिक दवाखाना वडवळ, येरोळ, पाटोदा, सिंधगाव, दर्जीबोरगांव, देवताळा, विळेगांव, जि.प. युनानी दवाखाना तळीखेड येथे आहेत. प्रा.आ.केंद्ग, जवळा (बु.), चिकुर्डा, भातांगळी, खरोळा, तांदुळजा, बिटंरगांव, हडोळती, हेर, निटूर, वांजरवाडा, उजनी, मातोळा, साकोळ, गंगापूर येथील नियमित आयुर्वेद वैद्यकीय अधिकारी मार्फत आयुष सेवा जनतेस दिल्या जातात. जिल्हास्तरावर जिल्हा आयुष कक्ष असून जिल्हा आयुष अधिकारी मार्फत आयुष कार्यक्रमाचे सनियंत्रण केले जाते. आयुष पॅथींचा प्रचार व प्रसार करणे, आयुष जीवनशैली रुजविणे, जास्तीतजास्त नैसर्गिक वस्तूंचा आहारात व दैनंदिन जीवनात वापर करणे, सकारात्मक विचार करणे, शारिरीक, मानसिक स्वास्थ्याबरोबरच सामाजिक व आध्यात्मिक स्वाथ्य वृधिंगत करणेविषयक जनजागृती करणे, आरोग्याचा दर्जा वाढविणे इ. आयुष कार्यक्रमाचे उद्देश आहेत.
6राष्ट्रीय क्षयरोग, कुष्ठरोग, व किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम या कार्यक्रमांतर्गत जिल्हयात बाहयरुग्ण विभागात व कार्यक्षेंत्रात आरोग्य कर्मचा-यांमार्फत प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे थुंकी नमुना तपासणी करुन दुषित थुंकी नमुना आढळलेल्या रुग्णास वैद्यकीय अधिका-यामार्फत निदान करुन आरोग्य कर्मचा-यामार्फत क्षयरोगाकरीता डॉट्‌स उपचार दिले जातात. कुष्ठरोगाकरीता बहुविध औषधोपचार केले जातात. हिवताप नियंञणाची अंमलबजावणी जिल्हा हिवताप अधिकारी यांचे मार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली केले जाते. तसेच जलजन्य आजार नियंञणासाठी जिल्हा साथरोग वैद्यकिय अधिकारी तसेच एकात्मिर रोग सर्वेक्षण अंतर्गत अंमलबजावणी केली जाते.
आरोग्य विभागाची रचना

जिल्हा आरोग्य अधिकारी हे आरोग्य विभागाचे विभाग प्रमुख असून जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी, हे राष्ट्रीय आरोग्य अभियान नाचे स्वतंत्र कामकाज पाहतात. जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे अधिपत्याखाली अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, व सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा साथरोग अधिकारी,कार्यरत आहेत

आरोग्य विभाग जि.प.लातुर कार्यालयाची रचना
No IMage Found
कार्यपुर्तीचे वेळापत्रक

आरोग्य विभागामापर्फत पुरविण्यात येणा-या कार्यपूर्तीचे वेळा पत्रक परिशिष्ट 2 मध्ये सादर केलेले आहे. शासकिय कर्तव्य पार पाडण्यास होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील प्रकरण क्र.3 च्या कलम 11 मध्ये केलेल्या न्यायप्रविष्ट बाबी लोकआयुक्त व इतर बाबी.

गा-हाणी + तक्रारी यांचे निराकरण

कार्यपुर्तीस होणारा विलंब व अन्य काही गा-हाणी असल्यास त्यासंबंधी परिच्छेद 3 मध्ये नमूद केलेल्या अधिका-याकडे तक्रार नोंदविणे व तक्रार प्राप्त झाल्यापासून सात दिवसात याची पूर्तता करण्याची जबाबदारी संबंधिताची राहील. पेन्शन धारकांच्या तक्रारी संदर्भात प्रत्येक महिन्याच्या दुस-या मंगळवारी जिल्हा परिषद मार्फत पेन्शन अदालतीचे आयोजन केले जाते. त्या संदर्भात विभागातील माहिती पुरविण्यात येते.

नागरिकांच्या सनदेचा आढावा + सिंहावलोकन

या नागरिकांच्या सनदेच्या उपयुक्तेबाबत तथा परिणामकारकतेचा आढावा आरोग्य विभागाकडून दरमहा घेण्यात येईल व त्यात आवश्यकतेनुसार किंवा प्रसंगानुसार बदल करण्यात येईल.

जनसामान्याकडून सुचना

ही नागरिकांची सनद सर्वसामान्य नागरिकांना पाहाण्यासाठी नेहमीच उपलब्ध असेल सन्मानीय नागरिकांच्या बहूमुल्य सुचनांचा गांर्भियपुर्वक विचार करुन त्यात वेळोवेळी सुधारणा घडवून आणता येईल. आरोग्य विभागाच्या अधिनस्त येणा-या सेवा उपभोगणा-या नागरिकांना आपले हक्क मांडण्यासाठी सनद नेहमी सहाकार्य करेल

नागरिकांच्या सनदेची अंमलबजावणी

आरोग्य विभागमध्ये या सनदेची अंमलबजावणी करण्यास कटीबध्द आहे. आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली सेवा कर्तव्य भावनेने व कार्यतत्परतेने उपलब्ध करून देण्याची हमी देत आहे. हया सेवा पुरवितांना नागरिकांना सौजन्यपुर्वक वागणूक देण्याची जबाबदारी विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचायांची राहील.

जिल्हा आरोग्य अधिकारी

अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी राष्ट्रीय आरोग्य अभियान

1. जिल्हा पशिक्षण पथक

2. वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ.केंद्र + उपकेंद्र

3. प्राथमिक आरोग्य केंद्र + उपकेंद्र

4. आयुर्वेदिक दवाखाने + ऍ़लोपॅथीक दवाखाने

5. पथक आरोग्य पथके

लातूर जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्गे / उपकेंद्गे
अ.क्र. तालुका प्रा.आ.केंद्गाची संख्या उपकेंद्गाची संख्या
1. लातूर 8 39
2 औसा 7 37
3 निलंगा 7 39
4 उदगीर 5 26
5 अहमदपूर 5 25
6 चाकुर 3 27
7 रेणापूर 5 21
8 देवणी 2 14
9 जळकोट 2 12
10 शिरुर अ­नंतपाळ 2 12
11 एकूण 46 252
संकेतस्थळ निर्मिती व देखभाल -सामान्य प्रशासन विभाग,जिल्हा परिषद,लातुर © 2015