राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोनती अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान

स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेचे (एसजीएसवाय) राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोनती अभियांनात (एनआरएलएम) मध्ये रुपांतर झाल्याने योजनेच्या अंमलबजावणीबाबत शासन निर्णय यंत्रणेला प्राप्त झाला.( सदर शासन निर्णय यंत्रणेचे पत्र क्र 1450 दि.3-7-2012 नुसार सर्व संबंधीत विभागांना पाठविण्यात आलेला आहे)

अभियानाचे उददेश
 1. राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोनती अभियानांतर्गत सेमि इंटेसिव्ह कार्यक्षेत्र वगळता पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत कोणतेही नविन गट व नविन संघ तयार करता येणार नाही.
 2. अस्तित्वात असलेल्या गटांच्या बळकटीकरणासाठी विशेष लक्ष पुरविण्यात येईल.
 3. ज्या स्वयंसहायता गटांना फिरतानिधी (आरएफ) दिला गेलेला नाही अशा सर्व गटांना फिरता निधी वितरीत करण्यात येईल.
 4. मुलभूत सुविधे अंतर्गत कोणतेही नविन काम हाती घेण्यात येवू नये/ मंजूरी देण्यात येवू नये/ मंजूर झालेले परंतू सुरु न झालेली कामे देखील सरु करु नये. एसजीएसवाय योजनेचे रुपांतर दि.01/4/2012 पासून एनआरएलएम योजनेमध्ये झाले असल्याने शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचना नुसार जिल्हयात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सेमी इंटेसिव्ह आणि नॉन इंटेसिव्ह अभियान स्वरुपात अंमलबजावणी करावयाची आहे.
मार्गदर्शक सूचना
 • यापुढे Semi-intensive वगळता, Non-Intensive मध्ये नविन गट स्थापन करावयाचे नाहीत.
 • आजपावेतो स्थापन गटांची तीन विभागत विभागणी करण्यात आली- (अ) सुरु असलेले गट. (ब) अनियमीत असलेले गट. (क) बंद पडलेले गट.
 • यंत्रणेची क्षमता बांधणी आणि प्रशिक्षण करणे.
 • समुहाची क्षमता बांधणी आणि प्रशिक्षण करणे.
 • स्वयंसहायता गटांची बँकांशी संलग्नता कर्जपुरवठा करुन करणे.
 • फिरता निधी आणि बँकांचा पतपुरवठा.
 • कर्ज व भांडवली अनुदान.
 • क्लस्टर स्तरावर सुक्ष्म उदयोग निर्मीती.
 • पायाभूत सुविधा आणि विपणन.
 • कौशल्य आणि रोजगार निर्मीती.
सेमि इंटेसिव्ह कार्यपध्दती
 • कार्यपध्दतीसाठी क्षेत्रनिवड- सेमि इंटेसिव्ह पध्दतीने मर्यादित तत्वावर अभियान अंमलबजावणीसाठी ग्राम पंचायतींची निवड करणे.
 • गाव प्रवेश कार्यक्रम आयोजित करणे.
 • गरीबांच्या संस्थांची माहिती घेणे.
 • लोकसहभागातुन गरीबांचे निर्धारण करणे.
 • समुदाय संसाधन व्यक्तिींची निवड करणे व त्यांची क्षमता बांधणी करणे.
 • बँक मित्र:- तालुका समन्वयक गावातील समुहांची माहिती घेतांना समुहातील बँक मित्र बनण्याची क्षमता असलेल्या महिलांची निवड करतील.
 • अंमलबजावणी यंत्रणेची क्षमता बांधणी करणे.
नॉन इंटेसिव्ह कार्यपध्दती

सेमि इंटेसिव्ह अंतर्गत निवडलेल्या गणातील ग्राम पंचायती व्यतिरिक्त उर्वरित ग्राम पंचायतींमध्ये नॉन इंटेसिव्ह कार्यपध्दतीनुसार अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. नॉन इंटेसिव्ह कार्यपध्दती क्षेत्रात कोणतेही नविन स्वयंसहायता समुह अथवा त्यांचे संघ स्थापन करता येत नाही.

 • तालुक्यातील कार्यरत विस्तार अधिकारी (समदाय संघटन व क्षमता बांधणी, (livelihoods & Bank linkage) यांना समि इंटेसिव्ह अंतर्गत निवडलेल्या ग्राम पंचायती व्यतिरिक्त उर्वरित सर्व ग्राम पंचायतींची जबाबदारी सम प्रमाणात देण्यात आली आहे.
 • नियमित/ अनियमित व बंद असलेल्या समुहांना मार्गदर्शन करणे. तसेच नॉन इंटेसिव्ह कार्यक्षेत्रात सध्या कार्यरत असलेल्या अशासकिय संस्था/ प्रेरक/प्रेरिका/संघटिका/सहयोगिनी किंवा अन्य संस्था यांच्या मदतीने कार्य करावे.