अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम व हरियाली पाणलोट विकास कार्यक्रम.
योजनेचा उद्देश
 • ग्रामीण समुहासाठी उत्पन्नाची कायमस्वरुपी साधने निर्माण करण्यांसाठी तसेच पेयजलाचा पुरवठा करण्यांसाठी सिंचन, फलोत्पादन व फुलोत्पादन यासह लागवड, कुरण विकास, मत्स्यव्यवसाय, इत्यादी प्रयोजनांसाठी पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब साठवणे.
 • ग्रामपंचायतीमार्फत ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण विकास करणे आणि पावसाचे पाणी साठवणे व त्याचे व्यवस्थापन करणे यातुन पंचायतीसाठी नियमित उत्पन्नाची साधने निर्माण करणे.
 • रोजगार निर्मिती करणे, दारिद्रय कमी करणे, सामाजीक सक्षमीकरण करणे आणि ग्रामीण क्षेत्राचा मानवी व अन्य आर्थीक साधनांचा विकास करणे.
 • ग्रामीण क्षेत्राची सर्वांगीग सुधारणा करण्यासाठी पिके, मानव व पशुधन यांच्यावरील अवर्षण व वाळवंटीकरणे यासारख्या अत्यंत विषम वातावरणीय परिस्थितीचा प्रतिकुल परिणाम सौम्य करणे.
 • नैसर्गीक साधन संपत्तीचा जसे-जमिन, पाणी, वनस्पती आच्छादन खास करुन वनरोपण, उपयोग संवर्धन व विकास करुन त्याद्वारे पर्यावरण समतोल राखणे.
 • पाणलोट क्षेत्रामध्ये निर्माण केलेल्या मत्तेचे कार्यान्वयन व देखभाल करण्यांसाठी सातत्याने सामुहीक कृती करण्यास आणि पाणलोट क्षेत्रातील नैसर्गीक साधनसंपत्तीच्या सुप्त सामर्थ्याचा आणखी विकास करण्यासाठी ग्रामीण समुहास उत्तेजन देणे.
 • स्थानीक तंत्रज्ञान, ज्ञान व उपलब्ध साहित्याचा वापर करणारे आणि त्यावर उभारलेले साधे, सोपे व परवडण्याजोगे तंत्रशास्त्रीय उपाय व संस्थात्मक व्यवस्था यांचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे.
योजनेचे निकष
 • जेथे पाणलोट क्षेत्राचा विकास करण्यासाठी तसेच निर्माण केलेल्या मत्तेचे कार्यचालन व देखभाल करण्यासाठी मजुर, रोख रक्कम, साहित्य, इत्यादींचा योगदानामार्फत लोक सहभागाचे आश्वासन दिले जाते असे पाणलोट क्षेत्र.
 • पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असलेले क्षेत्र.
 • अनुसूचीत जाती/अनुसूचीत जमातीची मोठी संख्या अवलंबुन असलेले पाणलोट क्षेत्र.
 • वनेतर पडीक जमिनीचे/अवनत जमिनींचे प्राबल्य असलेले पाणलोट क्षेत्र.
 • सामाजीक जमिनीचे प्राबल्य असलेले पाणलोट क्षेत्र.
 • जेथे प्रत्यक्ष मजुरी किमान मजुरीपेक्षा कमी आहे असे निदर्शनास आले आहे असे पाणलोट क्षेत्र.
 • ज्यांचा अगोदर विकास/उपचार करण्यांत आला आहे. अशा दुसऱ्या पाणलोट क्षेत्राच्या लगत असलेले पाणलोट क्षेत्र.
 • सामान्यत: संपुर्ण गावाचा समावेश असणारे सरासरी 500 हेक्टर्स क्षेत्रफळ पाणलोट क्षेत्र असेल. तथापी जर प्रत्यक्ष सर्वेक्षण केल्यावर, एखादे पाणलोट क्षेत्र, थोडेसे कमी किंवा जादा असल्याचे आढळुन आल्यास प्रकल्प म्हणुन विकास करण्यासाठी संपुर्ण क्षेत्र हाती घेण्यांत यावे.
योजना कशा प्रकारे राबविली जाते.

एका पाणलोटाची किंमत रु.30.00 लक्ष व पाणलोटाचे सरासरी क्षेत्र हे 500 हेक्टर, पाणलोट पुर्ण करावयाचा कालावधी मंजुरी दिनांकापासुन 5 वर्ष. सदर कार्यक्रमा अंतर्गत पाणलोटासाठी 75 टक्के निधी केंन्द्र शासन व 25 टक्के निधी राज्य शासन 5 वर्षात जसे प्रथम वर्ष 15 टक्के, द्वितीय वर्ष 30 टक्के, तृतीय वर्ष 30 टक्के, चतुर्थ वर्ष 15 टक्के व पंचम वर्ष 10 टक्के प्रमाणे एकुण 100 टक्के निधी उपलब्ध करुन देते.

 • प्रकल्प कार्यान्वयन अभिकरण (पी.आय.ए.) स्तरावर पाणलोट विकास पथक स्थापना, ग्रामस्तरावर पाणलोट विकास समिती स्थापवना करुन त्यांना शासनाने या जिल्हयासाठी नियुक्त केलेल्या मातृसेवाभावी संस्थेमार्फत प्रशिक्षण दिले जाते.
 • प्रशिक्षणानंतर नेट प्लॅनिंगद्वारे पाणलोटांचे प्रकल्प आराखडे पाणलोट विकास पथकामार्फत तयार केले जातात.
 • पाणलोट प्रकल्प आराखडयास जिल्हा पाणलोट विकास समितीद्वारे तांत्रीक मान्यता देण्यांत येते.
 • तांत्रीक मान्यता देण्यांत आलेल्या पाणलोट प्रकल्प आराखडयास जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यकारी समिती तथा नियामक मंडळाद्वारे मान्यता दिली जाते.
 • तांत्रीक व प्रशासकीय मान्यतेनंतर पाणलोट विकास समितीच्या मागणी प्रमाणे व मार्गदर्शक सुचनांना अधिन राहुन पी.आय.एञ च्या शिफारशीनुसार निधी वितरण करण्यांत येते.
 • पाणलोटातील कामे ग्रामस्तरावरील पाणलोट विकास मृद/जलसंधारण व वनीकरण समितीमार्फत पुर्ण करण्यांत येतात.
 • पाणलोट विकास मृद/जलसंधारण व वनीकरण समिती अध्यक्ष (सरपंच) व सचिव (ग्रामसेवक) यांचे संयुक्त स्वाक्षरीने आर्थीक व्यवहार केले जातात.
 • जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे मार्फत रास्त पाणलोट विकास मृद/जलसंधारण व वनीकरण समिती स्तरावर निधी वितरण करण्यांत येते.
 • पाणलोट कामावर प्रकल्प कार्यान्वयन अभिकरणाचे संपुर्ण संनियंत्रण पर्यवेक्षक व तांत्रीक मार्गदर्शन केले जाते.
 • पाणलोटातील उपचार कामे करीता असतांना वैयक्तीक इतर उपभोक्ता लाभार्थीकडुन 10 टक्के व अनुसूचीत जाती/अनुसूचीत जमाती, बी.पी.एल. व शासकीय सामुहीक जमिनीवरील 5 टक्के लोक वर्गणी प्रकल्प कार्यान्वयन अभिकरणामार्फत गोळा करुन पाणलोट क्षेत्र विकास संघाचे बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
पात्र लाभार्थी

निर्धारीत पाणलोट क्षेत्रामधील सर्व शेतकरी.