रमाई आवास योजना
रमाई आवास योजनेचे उद्देश
  • ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील अनु.जाती च्या गरीब व्यक्तींना घरकुल बांधण्यास आर्थिक मदत देणे हे या योजनेचे प्राथमिक उदिदष्ट आहे..
लाभाचे स्वरुप

या योजने अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग शासन ज्ञापन क्र. रआयो/2014 प्र.क्र.10/बांधकामे दिनांक 18 जुलै 2014 अन्वये घरकुल बांधकामासाठी 70,000 एवढे अनुदान घरकुल बांधण्यासाठी देण्यात येते. परंतु वरील शासन निर्णयानुसार दिनांक 1 एप्रिल 2013 पासून र.रु. 70,000/- वरुन 1,00000/- एवढे अनुदान घरकुल बांधकामासाठी देण्यात येते..

योजनेचे निकष

या योजने अंतर्गत घरकुलाचा लाभ देण्यासाठी लाभार्थीचा दारिद्रय रेषा कुटंब गणना 2002-2007 च्या यादी मधील 21 गुणांच्या आतील इंदिरा आवास योजने अंतर्गत घरकुलासाठी पात्र असलेल्या अनु. जाती/ अनु.जमातींच्या लाभार्थ्यांच्या ग्राम सभेने मंजुर केलेल्या कायम प्रतिक्षा यादीमध्ये समावेश असणे आवश्यक आहे.

योजना कशा प्रकारे राबविली जाते.

शासन निर्णय क्रमांक इंआयो-2010/प्र.क्र.34/ योजना 10 दिनांक 9 एप्रिल 2010 अन्वये तसेच ग्रामविकास व जलसंधारण मंत्रालय,मुंबई 400032 यांचे पुरक पत्र क्रमांक इं.आ.यो.2010/प्र.क्र.34/ योजना-10 दिनांक 12 डिसेंबर 2011 अन्वये दिलेल्या सुचनेनुसार प्रथम जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीची तालुकानिहाय इंदिरा आवास योजने अंतर्गत कायम प्रतिक्षा यादीमधाील शिल्लक लाभार्थ्यांच्या संख्येनुसार चढत्या क्रमाने यादी करण्यात आलेली आहे. म्हणजे तालुक्यातील ज्या ग्रामपंचायती मध्ये कायम प्रतिक्षा यादीत निवारा नसलेली सर्वात कमी कुटुंबे दिनांक 01/04/2010 रोजी शिल्लक आहेत ती ग्रामपंचायत प्रथम क्रंमाकावर व त्यानंतर चढत्या क्रमाने ग्रामपंचायतीची यादी तयार करण्यात आलेली आहे. त्यानुसार प्राप्त उदिदष्टांच्या अनुंषगाने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या चढत्या क्रमाने तयार केलेल्या यादीमधील पहिल्या क्रमांकाच्या ग्रामपंचायती पासुन सुरवात करुन त्यातील प्रत्येक गावातील सर्व अनु.जातीच्या लाभार्थ्यांना प्राप्त उदिदष्टांनुसार घरकुले प्रदान होई पर्यंत घरकुले मंजुर करण्यात येतात. वरिल प्रमाणे गावांची निवड जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा स्तरावर करण्यात येते. त्यानंतर निवडलेल्या गावांची यादी लाभार्थी मंजुरीसाठी पंचायत समीती स्तरावर पाठविण्यात येते. पंचायत समीती स्तरावर लाभार्थ्यांच्या यादीला प्रशासकिय मंजुरी देण्यात येते. लाभार्थ्यांना पंचायत समिती स्तरावर प्रशासकिय मंजुरी दिल्यानंतर पंचायत समिती स्तरावरुन पहिला हप्ता र.रु.25,000/- लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येतो. त्यानंतर दुसरा हप्ता र.रु.25,000/- व तिसरा हप्ता 20,000/- या प्रमाणे घरकुलाच्या प्रगती नुसार निधी लाभार्थीला रेखांकित धनादेशाद्वारे पंचायत समिती स्तरावरुन वितरीत करण्यात येते.

त्याचप्रमाणे दिनांक 1 एप्रिल 2013 नंतर मंजुर करण्यात आलेल्या घरकुलांसाठी रमाई आवास योजनेच्या घरकुलाच्या अनुदानाच्या किंमतीत वाढ करण्यात आल्यामुळे प्रथम हप्ता र.रु.35000/- दुसरा हप्ता र.रु.35000/- व तिसरा हप्ता र.रु.25000/- लाभार्थींला रेखांकित धनादेशाध्दारे पंचायत समिती स्तरावरुन वितरीत करण्यात येत आहे.

पात्र लाभार्थी

लाभार्थींचे नाव सन 2002-2007 च्या दरिद्रय रेषेखालील गणनेच्या यादीमधुन घरकुलासाठी पात्र असलेल्या अनु. जाती / जमातीच्या लाभार्थ्यांच्या ग्रामसभेने मंजुर केलेल्या इंदिरा आवास योजनेच्या कायम प्रतिक्षा यादी मध्ये समावेश असणे आवश्यक आहे.