सौर अभ्यासिका
  • महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण पुणे यांचेकडील प्राप्त अनुदानातून उद्योग ऊर्जा व कामगार विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडील शासन निर्णया नुसार जिल्हयातील ग्रामीण व दुर्गम भागात जेथे पारंपारिक पध्दतीने विजेचा वापर करणे खर्चीक आहे. किंवा भार नियमनामुळे वीज पुरवठा खंडीत होतो अशा विविध ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या अभ्यासिकांमध्ये रात्रीच्यावेळी अभ्यास करणे सोईचे व्हावे या दृष्टीने तसेच विद्यार्थ्याना होणाऱ्या त्रासापासून काही प्रमाणात मुक्त करण्याच्या दृष्टीने सौर घरगुती दिव्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो.म्हणून जिल्हयातील ग्राम पंचायती अंतर्गत असलेल्या सामुदायिक अभ्यासिका समाजमंदिर,ग्राम पंचायत कार्यालय, ग्राममंदिर, शाळा येथे विद्यार्थ्याची अभ्यासाची सोय व्हावी या दृष्टीने सौर घरगुती दिवा बसविणेत येतो. यासाठी शासना मार्फत 90% अनुदान व 10% ग्राम पंचायत हिस्सा देणेत येतो. शासन निर्णया प्रमाणे एका गावासाठी फक्त एकच सौर अभ्यासिका बसविणे बंधनकारक आहे.
  • अभ्यासिकेमध्ये बसविणेत येणार्यात सौर घरगुती दिव्याचे तांत्रिक मापदंड खालील प्रमाणे
  • सौर मोडयुलची क्षमता -74 वॅट
  • ब) बॅटरीची क्षमता - 12 व्होल्ट,75 ऐ.एच.
  • आवश्यक इलेक्ट्रॉनिक्स
  • एम.एस.ऍ़गल फ्रेम सौर पॅनल बसविणेसाठी
  • 9/11 वॅट क्षमतेचे 4 नग सी.एफ.एल. दिवे व फिक्सर
  • .
  • सौर अभ्यासिकेची देखभाल :
  • सौर फोटोवोल्टीक पॅनलच्या काचेवर हवेमध्ये असलेली धुळ बसते व धुळीमुळे सौर ऊर्जा सौर सेल्स पर्यत कमी प्रमाणात पोहोचते त्यामुळे ऊर्जा निर्मीतीचे काम बंद होते व त्यामुळे बॅटरी डिस्चार्ज होण्याची शक्यता असते. त्यामुळे दर 15 दिवसांनी तरी सौर पॅनलवरची धुळ कपडयाने किंवा पाण्याने साफ करणे गरजेचे आहे.
  • सौर फोटोवोल्टीक पॅनलला नेहमी स्वच्छ सूर्यप्रकाश गरजेचे आहे. त्यावर कोणत्याही झाडाची / इमारतीची तारेची सावली पडता कामा नये.
  • पॅनल नेहमी दक्षिण दिशेला झुकलेले असावे.
  • सौर संचामध्ये दिलेल्या बॅटरीमध्ये दर 3 महिन्यांनी डिस्टील वॉटरची लेवल चेक करणे. गरज भासल्यास डिस्टील वॉटर (नि:क्षार पाणी ) टाकणे.
  • बॅटरी मध्ये जर डिस्टील वॉटर (नि:क्षार पाणी ) नसेल तर नि:क्षार पाणी भरल्यावर दोन दिवसांनी प्रकाश नळी प्रज्वलित होईल. ( दिवा लागेल)
  • बॅटरी टर्मीनलला कार्बन अथवा हिरव्या पांढऱ्या रंगाची बुरशी साठली असेल तर लाकडी पट्टीने दुर करावी (साफ करावी ) व पेट्रोलियम जेलीचा रक्षात्मक लेप लावावा. ग्रीस अथवा ऑईल लावू नये.
  • सौर अभ्यासिका दरररोज 4 तास दिवे चालविण्यात यावेत.सदर सौर दिवे चालू बंद करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत शिपाई कर्मचारी यांच्यांवर देण्यात यावी. तसेच दर महिन्यांतून एकदा सौर पॅनल पाण्याने धुणे व दर 3 महिन्यांनी बॅटरी मधील डीस्टील वॉटर चेक करण्याची जबाबदारी ग्रामपचांयत शिपाई कर्मचारी यांच्यावर देण्यात यावी.