कृषि निवीष्ठा व गुण नियंत्रण
योजनेचे स्वरुप :
  • कृषि विकास अधिकारी हे जिल्हयातील रासायनिक खते ,बियाणे, किटकनाशके विक्रेत्यांना परवाना देण्यासाठी बियाणे, कायदा, किटकनाशक कायदा, रासायनिक खते नियंत्रण आदेश अंतर्गत परवाना अधिकारी आहेत.
  • परवाना धारक संख्या लाभार्थी निवडीबाबतचे निकष :
  • 1)रासायनिक खते – १३०५ .
  • 2)बियाणे - १३०२ .
  • 3)किटक नाशके - १०७४ .
  • 4)भाजीपाल रोपवाटीका - ०८ .
  • परावाना धारका साठी शैक्षणीक पात्रता :-
  • रासायनिक खते – बी.एससी.कृषि अथवा बी.एससी. रसायनशास्त्र पदवी अथवा कृषि पदवीका .
  • बियाणे / भाजीपाल रोपवाटीका - कोणत्याही व्यक्तीस परवाना घेता येतो .
  • किटक नाशके - बी.एससी.कृषि अथवा बी.एससी. रसायनशास्त्र अथवा बायोटेक्नालॉजी अथवा लाईफ सायन्स अथवा वनस्पती शास्त्र अथवा प्राणी शास्त्र अथवा जैवरसायन शास्त्र पदवी अथवा कृषि पदवीका .
  • परवाना फीस - :
  • 1)रासायनिक खते – रू. २२५०/- (घाऊक विक्रता) रू.४५० किरकोळ विक्रता.
  • 2)बियाणे - रू.१०००/-.
  • 3)किटक नाशके - रू.७५००/- (शहरी भाग) रू.१५०० (ग्रामीण भाग).
  • 4)भाजीपाल रोपवाटीका - रू.१०००/- ).

परवाना मिळण्यासाठी www.Mahaagri.gov.in या कृषी विभागाच्या वेबसाईटवर परवाना शुल्क भरुन ऑनलाईन अर्ज करावा. परवाना प्रस्तावाची एक प्रत संपूर्ण अभिलेख्यासह संबंधीत पंचायत समितीचे कृषी अधिकारी ( गुणनियंत्रण) यांचेकडे देवून पोहोच घ्यावी. .

परवान्यासाठी आवश्यक अभिलेखे.
  • 1.शैक्षणिक अर्हता.
  • 2. ऑनलाईन फार्म भरणे
  • 3. ऑनलाईन शुल्क भरणे
  • 4.कृषी अधिकारी पंचायत समिती यांचेमार्फत प्रस्ताव सादर करणे.